ETV Bharat / state

गुटखा बंदीसाठी सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा लढा, गेल्या 5 वर्षांमध्ये प्रशासनाला दिली तब्बल 166 निवेदने

author img

By

Published : Oct 30, 2020, 8:43 PM IST

Updated : Oct 31, 2020, 7:34 AM IST

तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी यावी यासाठी नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी आबादार हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये गुटखाबंदीची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाला तब्बल 166 निवेदने दिली आहेत.

Nanded Latest News
सामाजिक कार्यकर्ते बालाजी आबादार

नांदेड - तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यामुळे राज्यात गुटखा विक्री, साठा तसेच वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी नावापूरतीच असल्याचे दिसून येत आहे. शहरातच नव्हे तर राज्यातील प्रत्येक गाव खेड्यात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. मात्र याही परिस्थितीत गुटख्यावर पूर्ण बंदी आणावी, यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता दिवस रात्र शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी आतापर्यंत गुटखा बंदीसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल 166 निवेदने दिली आहेत. बालाजी आबादार असे त्यांचे नाव आहे. आबादार हे आम आदमी पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष देखील आहेत.

गुटखा बंदीसाठी सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा लढा

दरम्यान गुटखा बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री, सहाय्यक आयुक्त आन्न व औषध प्रशासन, पोलीस अधिक्षक नांदेड, जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, आणि पोलीस ठाण्यांना निवेदने दिली मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे त्यानी सांगितले. अन्न व औषध प्रशासन अधूनमधून कारवाई करते, पोलीस छापा टाकतात, त्यानंतर थोड्या दिवसांपूरती गुटखा विक्री थांबते मात्र पुन्हा सुरू केली जाते असे त्यांनी म्हटले आहे.

गुटखाबंदी नावालाच

'गुटखा' बंदी ही राज्यात केवळ नावालाच आहे. शहरातच नव्हे तर राज्यातील प्रत्येक गाव खेड्यात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून छापे टाकले जातात, मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्यांना देखील मर्यादा आहेत. पोलीस देखील दुर्लक्ष करतात. त्यामुळे राज्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे, असे आबादार यांनी म्हटले आहे.

5 वर्षांत 166 निवेदने देऊन देखील उपयोग नाही

मी गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयापर्यंत 166 निवेदने दिली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. जिल्हाधिकारी निवेदने मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवून केवळ पोस्टमनची भूमिका बजावतात. मात्र कुठलीही कारवाई होत नाही. आता आपण यानंतर गुटखाबंदीची अंमलबाजावणी करण्यासाठी राज्यपालांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Oct 31, 2020, 7:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.