ETV Bharat / state

अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेल्या हरिणीने ठोकला गावातच मुक्काम

चिंचाळा गावात पाणी व खाद्याच्या शोधात एका हरिणीने चिंचाळा या गावात मागील २ महिन्यांपासून मुक्काम ठोकला आहे.

author img

By

Published : Mar 31, 2019, 11:06 PM IST

अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेल्या हरणीने ठोकला गावातच मुक्काम

नांदेड - भोकर तालुक्याला मोठा जंगल परिसर लाभलेला आहे. दरम्यान, उन्हामुळे या जंगलातील उपलब्ध पाणीसाठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणी व खाद्याच्या शोधात एका हरिणीने चिंचाळा या गावात मागील २ महिन्यांपासून मुक्काम ठोकला आहे.

भोकर तालुक्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभलेले आहे. या वनात अनेक वन्यप्राणी आढळून येतात. मार्च महिना संपत आला असून भोकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भरपूर पाणी टंचाई आहे. अशातच जंगलातीलही अनेक नदी, नाले काही महिन्यांपूर्वीच कोरडेठाक पडले आहेत. जंगलात पाणी आणि खाद्य मिळत नसल्यामुळे अनेक जंगली किंवा हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करत असतात. अशाच प्रकारे चिंचाळा या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून एक हरीण (मादी) अन्न आणि पाण्याच्या शोधत आली होती. त्यानंतर या हरिणीने गावातच मुक्काम ठोकला. गावकरीही या हरिणीला कुठलीही इजा पोहोचू नये, याची काळजी घेऊन तितक्याच मायेने तिला वेळेवर अन्न आणि पाणी पुरवित आहेत.

गावात मुक्काम ठोकलेली ही हरीण दरदिवशी प्राथमिक शाळेच्या परिसरात फेरफटका मारून रोजच्या सवयीप्रमाणे शाळेत जाऊन आपली तहान भूक भागवित असते. मागील काही दिवसांपासून गावात मुक्काम ठोकलेल्या या हरिणीचा गावकऱ्यांना लळा लागला असून गावकरीही मोठ्या कौतुकाने या हरिणीच्या गोष्टी सांगत असलेले या गावात ऐकायला मिळत आहे.

Intro:नांदेड - अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेल्या हरणीने ठोकला गावातच मुक्काम.

नांदेड : भोकर तालुक्याला लाभलेल्या जंगल व त्यातील उपलब्द पाणीसाठे कोरडे पडल्यामुळे पाणी व खाद्याच्या शोधात एक 'हरीण' चिंचाळा या गावात गेल्या काही दोन महिन्यांपासून मुक्काम ठोकला आहेBody:
मार्च महिना संपत आला असून भोकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भरपूर पाणी टंचाई आहे, भोकर तालुक्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभलेलं3asun या वनात अनेक वन्यप्राणी आढळून येतात,अशायतच मार्च महिना संपत आला असून असून जंगलातील अनेक नदी नाले काही महिन्यांपूर्वीचं कोरडेठाक पडले आहेत. जंगलात पाणी आणि खाद्य मिळत नसल्यामुळे अनेक जंगली प्राणी किंवा हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करत असतात.Conclusion:
अश्याच प्रकारे चिंचाळा या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून एक हरीण (मादी) अन्न आणि पाण्याच्या शोधत आली होती त्यानंतर या हरिणीने गावातच मुक्काम ठोकला असून या हरिणीला गावकरीही कुठलीही इजा पोहचू नये याची काळजी घेऊन तितक्याच मायेने हरिणीला वेळेवर अन्न आणि पाणी पुरवीत आहेत. गावात मुक्काम ठोकलेली ही हरण दरदिवशी प्राथमिक शाळेच्या परिसत फेरफटका मारून रोजच्या सवाई प्रमाणे ती शाळेत जाऊन आपली तहान भूक भागवित असते. गेल्या काही दिवसांपासून गावात मुक्काम ठोकलेल्या या हरणीचा गावकऱ्यांना लळा लागला असून आणि गावकरीही मोठ्या कौतूकाने या हरिणीच्या गोष्टी सांगत या गावात ऐकायला मिळत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.