नांदेड - बँकेचे अकाउंट हॅक करून 14 कोटी 46 लाख रुपये वळवल्याची धक्कादायक घटना नांदेडात घडली आहे. आय.डी.बी.आय.च्या वजीराबाद शाखेत शंकर नागरी सहकारी बँकेचे खाते आहे. हॅकर्सनी शंकर नागरी बँकेच्या खात हॅक करून ही रक्कम लुबाडली आहे.
आयडीबीआय बँकेत असलेल्या शंकर नागरी सहकारी बँकेच्या खात्यातून हॅकरने एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे बँकेला चुना लावण्यात आला आहे. यामुळे खातेदार आणि ठेवीदार चिंतेत पडले आहेत. बँकेने सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. मात्र, ग्राहकांनी कसलीही चिंता करू नये, असे आवाहन शंकर नागरी सहकारी बँकेकडून करण्यात आले आहे.
शंकर बँकेच्या ग्राहकांनी चिंता करू नये - व्यवस्थापक
आयडीबीआय बँकेतील शंकर बँकेचे पैसे गेले असले तरी शंकर बँकेच्या ग्राहकांनी चिंता करू नये. ग्राहकांचा एक रुपयाही बुडणार नाही. या घटनेबाबत गुन्हा दाखल झाला असून नुकसान भरपाई आयडीबीआय बँकेला द्यावी लागणार असून कोणाचेही पैसे बुडणार नसल्याचे शंतकर बँकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रम राजे यांनी सांगितले.
हेही वाचा - शॉर्टसर्किटने हायवा ट्रक जाळून खाक झाल्याने सात लाखाचे नुकसान
हेही वाचा - पहिली किसान रेल्वे नगरसोल येथून गुवाहाटीला रवाना