ETV Bharat / state

रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्वीकारण्याला सुरुवात, 'ही' आहे अंतिम तारीख

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्को टोकीयो कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीच्या वतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०२०-२०२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले आहे.

Rabbi season crop insurance offer
रब्बी हंगाम
author img

By

Published : Nov 11, 2020, 3:07 AM IST

नांदेड - प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०२०-२०२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले आहे. रब्बीतील ज्वारी पिकासाठी पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर, तर गहू बागायती, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्को टोकीयो कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीच्या वतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०२०-२०२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

पीकनिहाय समाविष्ट तालुके

हरभरा : नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलूर, मुखेड व किनवट ( सर्व मंडळ )

गहू (बागायती) : नांदेड (वजीराबाद व नांदेड ग्रामीण वगळून सर्व मंडळ ), कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव व भोकर तालुके

रब्बी ज्वारी : बिलोली, धर्माबाद, मुखेड (सर्व मंडळ), देगलूर, नायगाव, नांदेड, किनवट व हदगाव तालुके

हेही वाचा- नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात विद्यार्थ्यांनीच सुरू केली स्वॅब तपासणी लॅब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.