ETV Bharat / state

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला ५ वर्ष सक्तमजुरी

author img

By

Published : Nov 16, 2019, 12:45 PM IST

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने 5 वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तामसा शहरातील एका 9 वर्षीय चिमुकलीवर 10 सप्टेंबर 2017 मध्ये लैंगिक अत्याचार झाला होता.

नांदेड जिल्हा सत्र न्यायालय

नांदेड - बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने 5 वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तामसा शहरातील एका 9 वर्षीय चिमुकलीवर 10 सप्टेंबर 2017 मध्ये लैंगिक अत्याचार झाला होता.

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीला पाच वर्षाची सुनावली शिक्षा

हेही वाचा - साळशिंगेतील हत्येप्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक

पीडिता सायंकाळी शाळेतून घरी निघाली होती. वाटेतच पीडिता दप्तर धुण्यासाठी नाल्यावर थांबली असता, आरोपीने तिची छेड काढली व अत्याचार केला होता. त्यानंतर आरोपी राजू सोनटक्के (वय-22) हा घटनेनंतर फरार झाला होता.

पोलिसांनी कलम 354, अ‌ॅट्रॉसिटी कायदा, पोक्सो कलम 8 व 10 अन्वये तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास भोकरचे तत्कालीन उपाधीक्षक डी. एम. वाळके यांनी केला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सहा साक्षीदार तपासून जिल्हा सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी 15 नोव्हेंबर रोजी आरोपी राजूला पोस्को कायदा कलम 10 अन्वये दोषी ठरवत 5 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील एम. ए. बत्तुल्ला डांगे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एम. चंदापुरे यांनी मदत केली.

हेही वाचा - पतीने केली पत्नी व मुलाची गळा आवळून हत्या; कारण अस्पष्ट

Intro:नांदेड : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुणाला पाच वर्षे सक्तमजुरी.

नांदेड : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात एका तरुणाला चौथे जिल्हा सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.Body:
तामसा शहरातील एक ९ वर्षीय चिमुकली १० सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४.३० वाजता शाळेतून घरी आली आणि नंतर ती जवळच्या नाल्यावर दप्तर धुण्यासाठी गेली. तेथे ती दप्तर धुत असताना गावातील राम मंदिर गल्ली भागात राहणारा राजू
सोनटक्के-२२ हा तरुण तेथे आला आणि त्याने तिच्याशी लगट करीत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडितेने आरडाओरडा केल्यावर काही महिला धावून आल्या आणि राजू पळून गेला. ही
घटना पीडितेने घरी जाऊन तिच्या आईला सांगितली आणि नंतर तामसा पोलीस ठाणे गाठून पीडितेने राजू विरुद्ध फिर्याद दिली.Conclusion:
त्यानुसार कलम ३५४, अॅट्रॉसिटी कलम-१, डब्ल्यू.I,II,पोस्कोच्या कलम ८ व १० अन्वये तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास भोकरचे तत्कालीन उपाधीक्षक डी.एम.वाळके यांनी करुन नांदेड सत्र न्यायाधीशाच्या
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणात सहा साक्षीदार तपासून जिल्हा सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी १५ नोव्हेंबर रोजी आरोपी राजूला पोस्को कायदा कलम १० अन्वये दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली
आहे. या प्रकरणात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील एम.ए.बत्तुल्ला डांगे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी.एम.चंदापुरे यांनी मदत केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.