ETV Bharat / state

कोरोनाचा फटका : नांदेडमध्ये अडकलेल्या उत्तराखंडच्या जगदगुरूंना 'या' मंत्र्यांमुळे मिळाली प्रवासाची परवानगी

अक्षयतृतीयेला कपाट उघडल्यानंतर हा मुकूट पुन्हा एकदा श्री केदारनाथांच्या मूर्तीवर जगदगुरूंच्या हस्ते विधीवत ठेवल्या जातो. यामुळे जगद्गुरु यांना अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र संचारबंदीत जगदगुरू नांदेड येथे अडकले आहेत.

Kedarnath
जगदगुरूंना परवानगीचे पत्र देताना पालकमंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Apr 16, 2020, 12:56 PM IST

नांदेड - बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील श्रीक्षेत्र केदारनाथ येथील जगद्गुरु श्रीश्रीश्री १००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर श्री केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात येते. परंतु जगद्गुरु संचारबंदीमुळे नांदेड येथे अडकून पडले आहेत. या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच प्रयत्नाने जगद्गुरु यांना त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांसह उत्तरराखंड राज्यात जाण्याचा शासनाने परवाना दिला आहे.

श्री केदारनाथ मंदिराचे दरवर्षी दिपावलीला कपाट बंद होत असते. तर अक्षयतृतीयेला मंदिराचे कपाट उघडण्यात येते. धार्मिक विधी जगद्गुरु यांच्या हस्तेच संपन्न होत असतात. दिवाळीला कपाट बंद झाल्यानंतर श्री केदारनाथ यांच्या डोक्यावर असणारा सोन्याचा मुकूट जगद्गुरु यांच्याकडे तो सहा महिने असतो. अक्षयतृतीयेला कपाट उघडल्यानंतर हा मुकूट पुन्हा एकदा श्री केदारनाथांच्या मूर्तीवर विधीवत ठेवला जातो. यामुळे जगद्गुरु यांना अनन्यसाधारण महत्व आहे.

या सोहळ्यास जाण्यासाठी जगद्गुरु यांनी सर्व तिकिटे आधीच आरक्षित केली होती. परंतु कोरोनामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली. अशावेळी निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांना प्रवास परवाना मिळूवन दिला. जगद्गुरु यांच्या समवेत स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी हे ही जाणार आहेत.

आज जगद्गुरु यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रवास परवाना सुपूर्द केला. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.