ETV Bharat / state

कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक; भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न..! - नांदेड कापूस खरेदी केंद्र

कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाचा दर्जा ठरवून कापूस खरेदी करत नव्हते. तसेच कापूस परत पाठवत होते. बऱ्याचवेळा त्यांचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नव्हते. शेवटी भाजपचे अमोल कपाटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरिक व पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

नांदेड
नांदेड
author img

By

Published : Nov 21, 2020, 8:29 PM IST

Updated : Nov 21, 2020, 9:35 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील भोकर रस्त्यावर सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाचा दर्जा ठरवून कापूस खरेदी करत नव्हते. तसेच कापूस परत पाठवत होते. बऱ्याचवेळा त्यांचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नव्हते. शेवटी भाजपचे अमोल कपाटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरिक व पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक

तीन ठिकाणी सुरू आहेत खरेदी केंद्र
नांदेड जिल्ह्यात भोकरफाटा, धर्माबाद, कुंटूर आदी ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली असून दि. १८ नोव्हेंबरपासून भोकरफाटा येथे सालासर जिनिंगमध्ये भारतीय कपास निगम लिमिटेडची खरेदी सुरू झाली आहे.
शेतकऱ्याच्या कापसामध्ये होत होती ग्रेडिंग
येळेगाव (ता.अर्धापूर) येथील एका शेतकऱ्याने गेल्या दोन दिवसांपासून भोकरफाटा येथील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणला होता. पण, सदरील कापसामधील काही चांगला दर्जाचा कापूसच घेतो. आम्ही थोडाही खराब झालेला कापूस घेणार नाही, अशी तंबी देत शेतकऱ्याला कापूस परत घेऊन जाण्यासाठी सांगत होते. शेतकऱ्यांनी विनंती करूनही ग्रेडिंग केली जात होती.
शेतकरी व भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक
वारंवार विनंती करूनही ऐकत नसल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. त्यावेळी येथील खरेदीही शेतकऱ्यांनी थांबवली. तर भाजप युवा मोर्चाचे माजी चिटणीस अमोल कपाटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण, ऐनवेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अमोल कपाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही केली. यावेळी भाजपचे भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, प्रभू कपाटे, बाबुराव क्षीरसागर, दत्ता कपाटेंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दुपारनंतर कापूस खरेदी सुरू
आंदोलन व कार्यकर्त्याने आत्महदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्यानंतर सदरील कापूस खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत शेतकऱ्यांचा कापूसही खरेदी केला. तसेच इतरही शेतकऱ्यांची खरेदी सुरू केली. सदरील खरेदी केंद्रावर बाराशेच्यावर शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून इतरही ठिकाणी कापूस खरेदी सुरू होईल, असे सांगण्यात आले.

Last Updated : Nov 21, 2020, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.