नांदेड - एक्झिट पोलचे अंदाज काहीही निघू शकतात. तो सॅम्पलिंग सर्व्हे असतो. वस्तुनिष्ठ खरी परिस्थिती २३ तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. देशात परिवर्तनाची लाट आहे, त्यामुळे देशात भाजप सरकार निश्चितच येणार नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून येणे बाकी आहे. एक्झिट पोलचे अंदाज बरोबर नसतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि घटक पक्षाला २४ ते २५ च्यावर जागा मिळतील. असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नांदेड लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच विजयी होणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर, अनेक विविध संस्थांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून भाजप सर्वात मोठ्ठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.