नांदेड : प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी नांदेड पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. 55 दिवसांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी नांदेड पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. आता या हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता सात झाली आहे. याबाबत नांदेड पो. स्टे. विमानतळ, येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील 6 आरोपींना विविध राज्यांतून अटक करण्यात आली असून, 1 जून रोजी या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी पंजाब राज्यातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीस अटक : हरदीपसिंघ उर्फ हार्डी सपुरे (रा. यात्रीनिवास रोड, नांदेड) यांचा सहभाग असल्याची व तो पंजाब राज्यामध्ये पळून गेल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. आरोपीस पकडून पथक तयार करून पंजाब येथे रवाना करण्यात आले. सदर आरोपीच्या तपासात गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आल्याने दिनांक 1 जून 2022 रोजी अटक करण्यात आली. या आरोपीस आज रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता, त्याची दिनांक 10 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : Sanjay Biyani Murder Case : सहा आरोपी, सात राज्य; बियाणी हत्या प्रकरणात पोलिसांचा उलगडा