नांदेड - हिम्मत असेल तर आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी कोणत्याही पक्षाकडून नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून दाखवावी, असे जाहीर आव्हान काँग्रेसचे नांदेड महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी शिराढोण येथील एका कार्यक्रमात दिले आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात पुन्हा काँग्रेसच विजयी होणार, यात भाजप नेत्यांनाही शंका नाही. मात्र, कंधार आणि लोहा मतदारसंघात आता परिवर्तन घडणार असल्याचे सूचक संकेत त्यांनी दिले.
कंधार तालुक्यातील शिराढोणमध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. राजूरकर यांच्या निधीतून संभाजी चौक ते पूल सीसी रस्ता करणे (खर्च ५ लाख ), खासदार निधीतून शाळेची कमान ते बस स्टॉप (खर्च १२ लाख), जिल्हा परिषद निधीतून पुलाची संरक्षण भिंत बांधणे (खर्च २ लाख) यासह अन्य विकास कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार रोहिदास चव्हाण, उपमहापौर विनय गिरडे, अनिल मोरे, माधवराव पाटील पांडागळे, पंडितराव देवकांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील पांडागळे, संतोष पांडागळे, जि. प. सदस्य मनोहर शिंदे आदींची उपस्थिती होती.