नांदेड - उद्घाटनाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांना कात्री न मिळाल्याने त्यांनी चक्क हाताने रिबीन तोडत हॉटेलचे उद्घाटन केले आहे. हैदराबादी हिंदी चित्रपटातील हास्य कलाकार गुल्लूदादा या नावाने प्रसिद्ध असलेला अदनान साजिद यांच्या सोबत हा किस्सा घडला आहे. याचा व्हिडीओ साध्य समाज माध्यमावर प्रचंड वायरल झाला आहे.
अभिनेता अदनान साजिद हे एका कार्यक्रमानिमित्त नांदेडमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, उद्घाटनावेळी फित कापण्यासाठी आलेल्या गुल्लुदादाला कात्रीच मिळाली नाही. पाच मिनिटे थांबूनही गुल्लुदादापर्यंत कात्री पोहोचलीच नाही. यामुळे कंटाळलेल्या गुल्लुदादाने उपस्थितांच्या मदतीने अक्षरशः रिबीन हाताने तोडली आणि उद्घाटन केले. गुल्लुदादाच्या हस्ते अशा प्रकारचे झालेले उद्घाटन पाहून उपस्थितांना हसू अनावर झाले. उद्घाटन प्रसंगी घडलेल्या या कॉमेडी उद्घाटनाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - आयडीबीआय बँकेतील शंकर बँकेच्या खात्यावर सायबर हल्ला, कोट्यवधींचा चुना
हेही वाचा - पहिली किसान रेल्वे नगरसोल येथून गुवाहाटीला रवाना