नांदेड - जिल्ह्यासह संपूर्ण देशभर गाजलेल्या उमरी तालुक्यातील नागठाणा मठाचे मठाधिपती गुरुनिर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांसह मठातील अन्य एकाची हत्या करणारा आरोपी साईनाथ लिंगाडे यास आज पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. भोकर न्यायालयाने त्याला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उमरी तालुक्यातील नागठाणा मठाचे मठपती गुरुनिर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांसह अन्य एका भक्ताची रविवारी पहाटे दोनच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी उमरी पोलिसांनी आरोपी साईनाथ लिंगाडे यास तेलंगणातील तानूर येथून अटक केली होती. उमरी पोलिसांनी आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.