नांदेड - आशा गटप्रवर्तक महिलांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. आशा गटप्रवर्तक यांना किमान २१ हजार रुपये वेतन द्यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
नांदेडमध्ये आशा प्रवर्तक यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत नाही. त्यामुळे आशा वर्कर आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच निषेधार्थ शुक्रवारी सिटू संघटनेच्या नेतृत्वात हजारो आशा वर्कर यांनी जिल्हा परिषदेत घुसून ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांच्या घोषणाबाजीने जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला होता.
हेही वाचा - अहो आश्चर्यम..! समृद्धी महामार्गात चक्क जमीन गेली चोरीला, शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी