ETV Bharat / state

Nanded Police: पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न, गोदावरी नदीत घेतली उडी - शेषेराव राठोड यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत एका पोलीस उपनिरीक्षकांने थेट गोदावरी नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज गुरुवार (दि. ५ जानेवारी)रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोवर्धनघाट पुलावर घडली. (Nanded Police) या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सध्या उपनिरीक्षकास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक शेषेराव राठोड
पोलीस उपनिरीक्षक शेषेराव राठोड
author img

By

Published : Jan 5, 2023, 10:17 PM IST

नांदेड - पोलीस उपनिरीक्षक असलेले शेषेराव राठोड सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. गुरूवारी राठोड हे सकाळी ११ च्या सुमारास गोवर्धनघाट पुलाकडे गेले. काहीवेळ इकडे तिकडे पाहून त्यांनी थेट गोदावरी नदीपात्रात उडी घेतली. (jumping into the Godavari river ) यावेळी गोदावरी पात्राजवळ असलेल्या नागरीकांनी त्यांना तातडीने पाण्याबाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भंडरवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली अशी प्राथमिक माहिती आहे.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न - राठोड यांनी हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये राठोड हे गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. राठोड यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, शहरामध्ये उलट सुलट चर्चेला उधान आले होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक भंडरवार यांनी, सदर कर्मचारी हा काही दिवसांपूर्वी आजारी होते. या आजारास कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊस उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आजारी असल्याची चर्चा - राठोड यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्या आजारामुळे केला आहे अशीही चर्चा आहे. मात्र, त्या आजाराविषयी काही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलीस विभागातूनही काही ठोस रिपोर्ट देण्यात आला नाही. मात्र शहरामध्ये या विषयावर उलट सुलट चर्चा आहे. तसेच, पोलीस विभागातही यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे खळबळ उडालेली आहे.

नागरिकांची तत्परता - राठोड यांनी गोदावरी पात्रात उडी घेतली तेव्हा आजु-बाजूला नागरिक होते म्हणून तात्काळ त्यांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. अन्यथा काही अघटीत घडण्याचीही परिस्थिती ओढावली असती. त्यामुळे यावेळी ज्या नागरिकांनी प्रसंगावधान राखले त्या नागरिकांचेही परिसरात कौतूक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.