नांदेड - जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने 'जुकिनी'(zucchini) या विदेशी फळभाजीची यशस्वी शेती केली आहे. लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील संजय ताठे या शेतकऱ्याने हा प्रयोग यशस्वी केला. या पिकाच्या बीजोत्पादनातून त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांचा नफा कमावला आहे.
आपल्या देशात जुकिनीचा खाण्यासाठी लोक वापर करत नसल्याने संजय ताठे फक्त त्याचे बीज उत्पादनकरून यातून वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत. जुकिनी या फळ भाजीला क्युकरबिटा पेपो (Cucurbita Pepo) तसेच कोर्गगेट (Courgette) या नावाने जगभरात ओळखले जाते. औषधी गुणधर्मामुळे ही फळभाजी अनेक आजारांवर रामबाण औषध म्हणून ओळखली जाते.