ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 7 लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका; ४३० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी

जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरिपाचा घास हिरावून घेतला. जून, जुलै व ऑगस्टमध्ये काहीसा कमी बरसलेल्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये मात्र रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यातील सरासरी ७२. ६२ मिलिमीटर पर्जन्यमान असताना यंदा २८४ टक्क्यांनुसार २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह कपाशी व ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यात 7 लाखांवर शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका
author img

By

Published : Nov 12, 2019, 10:34 AM IST

Updated : Nov 12, 2019, 11:30 AM IST

नांदेड - जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात नुकसान झालेल्या सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी संयुक्त अहवालाद्वारे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात 7 लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरिपाचा घास हिरावून घेतला. जून, जुलै व ऑगस्टमध्ये काहीसा कमी बरसलेल्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये मात्र रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यातील सरासरी ७२. ६२ मिलिमीटर पर्जन्यमान असताना यंदा २८४ टक्क्यांनुसार २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह कपाशी व ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अहवाल शासनाला सादर करण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यामुळे महसूल, कृषी व जिल्हा परिषद यंत्रणाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्याचा अंतिम अहवाल महसूल व कृषी विभागाकडून प्राप्त झाला. यानंतर जिल्हाधिकारी डोंगरे व चलवदे यांनी हा अहवाल शासनाला सादर करून 'एनडीआरएफ'च्या प्रचलित निकषानुसार ४३० कोटी रुपयांची मागणी केली.

हेही वाचा - राऊत यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची पूर्ण कल्पना- दीपक सावंत

साडेसहा लाख हेक्टरचे नुकसान -

जिल्ह्यात आठ लाख ७८ हजार ३८ हेक्टर पेरणीलायक क्षेत्रापैकी यंदा आठ लाख तीन हजार ५१० हेक्टरवर पेरणी झाली होती. या पेरणी क्षेत्रापैकी तब्बल सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यात कोरडवाहू क्षेत्राचे सहा लाख ४८ हजार ७८ , बागायती ६१ व बहुवार्षिक फळपिकांचा १७७ हेक्टरचा समावेश आहे. अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान जिरायती पीक असलेल्या सोयाबीनचे तीन लाख ७५ हजार ३७३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर पांढरे सोने असलेल्या कपाशीचे दोन लाख चार हजार १६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे . ज्वारीचे ३५ हजार ८८४ हेक्टर, तूर १२ हजार ५७४ हेक्टर, मूग एक हजार २२३ हेक्टर व इतर पिकाचे चार हजार सहा हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. तर, बागायती पिकांमध्ये भाजीपाला पिकांचे ५९ हेक्टर असे एकूण ६१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. बहुवार्षिक फळपिकांमध्ये ७ हेक्टर मोसंबी, चिकू ३ हेक्टर व इतर १५६ फळपीके, असे एकूण १७७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

'एनडीआरएफ'नुसार भरपाईची मागणी-

जिल्ह्यात नुकसानीचा फटका सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना बसला. यावरून जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येत आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 'एनडीआरएफ'च्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख ८० हजार तीनशे रुपयांची मागणी केली आहे. यात कोरडवाहूसाठी ४३० कोटी ५९ लाख ७० हजार ८००, बागायतीसाठी आठ लाख २३ हजार ५०० रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी ३१ लाख ८६ हजार रुपयांची मागणी केली आहे. यामध्ये कारडवाहूसाठी हेक्टरी ६ हजार ८००, बागायतीसाठी १३ हजार ५०० व बहुवार्षिक फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यात येते. ही मदत दोन हेक्टरपर्यंत देण्याचा शासन आदेश आहे.

Intro:नांदेड जिल्ह्यात सात लाखाच्या वर शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका...; ४३० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी..!
Body:नांदेड जिल्ह्यात सात लाखाच्या वर शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका...; ४३० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी..!

नांदेड: जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक, अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात नुकसान झालेल्या सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी संयुक्त अहवालाद्वारे केली आहे.

जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरिपाचा घास हिरावून घेतला. जून, जुलै व ऑगस्टमध्ये काहीसा कमी बरसलेल्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये मात्र रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यातील सरासरी ७२. ६२ मिलिमीटर पर्जन्यमान असताना यंदा २८४ टक्क्यांनुसार २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह कपाशी व ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अहवाल शासनाला सादर या बाबत शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते . यामुळे महसूल, कृषी व जिल्हा परिषद यंत्रणाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले. या पंचनामाचा अंतिम अहवाल महसूल व कृषी विभागाकडून प्राप्त झाला. यानंतर जिल्हाधिकारी डोंगरे व श्री. चलवदे यांनी हा अहवाल शासनाला सादर करून 'एनडीआरएफ' च्या प्रचलित निकषानुसार ४३० कोटी रुपयांची मागणी केली.

साडेसहा लाख हेक्टरचे नुकसान.....!
________________
जिल्ह्यात आठ लाख ७८ हजार ३८ हेक्टर पेरणीलायक क्षेत्रापैकी यंदा आठ लाख तीन हजार ५१० हेक्टरवर पेरणी झाली होती. या पेरणी क्षेत्रापैकी तब्बल सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यात कोरडवाहू क्षेत्राचे सहा लाख ४८ हजार ७८ , बागायती ६१ व बहुवार्षिक फळपिकांचा १७७ हेक्टरचा समावेश आहे. अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान जिरायती पीक असलेल्या सोयाबीनचे तीन लाख ७५ हजार ३७३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर पांढरे सोने असलेल्या कपाशीचे दोन लाख चार हजार १६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे . ज्वारीचे ३५ हजार ८८४ हेक्टर, तूर १२ हजार ५७४ हेक्टर, मूग एक हजार २२३ हेक्टर व इतर पिकाचे चार हजार सहा हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. तर बागायती पिकांमध्ये भाजीपाला पिकांचे ५९ हेक्टर, केळी , असे एकूण ६१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. बहुवार्षिक फळपिकांमध्ये सात हेक्टर मोसंबी, चिकू तीन हेक्टर व इतर १५६ फळपिक, असे एकूण १७७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे .

" एनडीआरएफ ' नुसार भरपाईची मागणी....
___________________
जिल्ह्यात नुकसानीचा फटका सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना बसला. यावरून जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येत आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 'एनडीआरएफ' च्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख ८० हजार तीनशे रुपयांची मागणी केली आहे. यात कोरडवाहूसाठी ४३० कोटी ५९ लाख ७० हजार आठशे, बागायतीसाठी आठ लाख २३ हजार पाचशे रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी ३१ लाख ८६ हजार रुपयांची मागणी केली आहे. यामध्ये कारडवाहूसाठी हेक्टरी सहा हजार आठशे, बागायतीसाठी १३ हजार पाचशे व बहुवार्षिक फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत देण्यात येते. ही मदत दोन हेक्टरपर्यंत देण्याचा शासन आदेश आहे.Conclusion:
Last Updated : Nov 12, 2019, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.