नांदेड - जिल्ह्यात बुधवार 2 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 115 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 380 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 123 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 257 बाधित आले. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या एकूण 1 हजार 614 अहवालापैकी 1 हजार 195 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 407 एवढी झाली असून यातील 4 हजार 777 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 67.14 टक्के एवढे झाले आहे. एकूण 2 हजार 337 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 249 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
सोमवार 31 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील हिंगोली गेट नांदेड येथील 64 वर्षाचा एका पुरुषाचा, तरोडा नांदेड येथील 68 वर्षाचा एक पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मंगळवार 1 सप्टेंबर 2020 रोजी मगनपुरा नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर पोलीस कॉलीनी नांदेड येथे 53 वर्षाचा एक पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल, नांदेड येथे मृत्यू झाला. बुधवार 2 सप्टेंबर 2020 रोजी तरोडा नांदेड येथे 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर कासराळी बिलोली येथील 60 वर्षाच्या एक पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 243 झाली आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 52 हजार 54,
घेतलेले स्वॅब- 49 हजार 936,
निगेटिव्ह स्वॅब- 40 हजार 488,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 380
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 7 हजार 407
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-17
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7
एकूण मृत्यू संख्या- 243
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 777
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 337
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 375
आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 249.