ETV Bharat / state

कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील नऊ व्यक्तींसह २० जणांना केले क्वारंटाईन; अबचलनगरचा भाग 'कंटेनमेंट झोन' घोषित - Nanded Corona Update

गेले महिनाभर नांदेडमध्ये कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. परंतु, पाच दिवसांपूर्वी शहरातील पीर बुऱ्हाणनगर भाग कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, या भागातील अनेक वसाहतींमध्ये मनपाच्या आरोग्य विभागाकडून घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Nanded Corona Update
नांदेड कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 28, 2020, 1:31 PM IST

नांदेड - पाच दिवसांपूर्वी शहरातील पीर बुऱ्हाणनगर भागात कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्या पाठोपाठ आता दुसरा रुग्ण अबचलनगर भागात रविवारी आढळून आला आहे. आठवडाभरातच शहरात लागोपाठ दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाने उपाययोजना आणखी कडक केल्या आहेत. भगतसिंग रोडवरील अबचलनगरचा भाग मनपा आयुक्तांनी ' झोन' म्हणून घोषित आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील नऊ व्यक्तींसह त्याच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या भागातील अडीचशे घरातील सुमारे पंधराशे लोकांची तपासणीही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर त्याची नांदेडमध्येही कडक अंमलबजावणी केली गेली. परिणामी गेले महिनाभर नांदेडमध्ये कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. परंतु, पाच दिवसांपूर्वी शहरातील पीर बुऱ्हाणनगर भाग कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, या भागातील अनेक वसाहतींमध्ये मनपाच्या आरोग्य विभागाकडून घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी २५० पथके तयार करण्यात आली आहेत.

त्या पाठोपाठ रविवारी अबचलनगर भागातही कोरोनाचा रुग्ण आढळून आला. मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सोमवारी सकाळीच अबचलनगर भागाची पाहणी केली. उपायुक्त (आरोग्य) अजितपालसिंघ संधू तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन हेही यावेळी उपस्थित होते. या भागात मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी हायपोक्लोराईडची फवारणी करून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना आणि त्याच्या संपर्कात आलेल्या ११ व्यक्तींना एनआरआय यात्री निवास येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती मनपा अधिकाऱयांनी दिली.

अबचलनगर येथे आढळून आलेल्या ४४ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडूनही या भागातील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. या भागासाठी मनपाने स्वतंत्र तपासणी पथके तयार केली आहेत. दरम्यान, शहरातील प्रमाण नगर भागात आज सलग सहाव्या दिवशी मनपाच्या आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन तेथील व्यक्तींना कोरोनाची काही लक्षणे आहेत काय, याची तपासणी केली. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.