ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - नांदेड गुन्हे

यशवंतनगरच्या विस्तारित भागातील रहिवासी गजानन मस्के व भाऊ किशन मस्के यांच्या मुली २२ ऑगस्टला नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी दुचाकीवरून घराबाहेर गेल्या होत्या. शिकवणीसाठी गजानन यांची मुलगी वर्गात गेली. मात्र....

शिकवणीसाठी दुचाकीवरून घराबाहेर गेलेल्या मुलीचे गाडीसह अपहरण करणाऱ्या दोघांविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
author img

By

Published : Aug 26, 2019, 10:07 AM IST

नांदेड - शिकवणीसाठी दुचाकीवरून घराबाहेर गेलेल्या मुलीचे गाडीसह अपहरण करणाऱ्या दोघांविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील यशवंतनगरच्या विस्तारित भागातील रहिवासी गजानन मस्के व भाऊ किशन मस्के यांच्या मुली २२ ऑगस्टला नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शिकवणीसाठी घराबाहेर गेल्या होत्या. शिकवणीसाठी गजानन यांची मुलगी वर्गात गेली; मात्र, किशन यांची मुलगी शिकवणीला आलीच नाही.

काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर गजानन यांच्या मुलीने हे कुटुंबीयांना सांगितले. बेपत्ता मुलीचा शोध सुरू झाला. परंतु, कोणताही सुगावा लागला नाही. भयभीत झालेल्या बेपत्ता मुलीच्या बहिणीला विश्वासात घेतल्यानंतर, सिध्देश्वर काळे व गंगाधर भोकरे यांनी तिला गाडीसह पळवून नेल्याची माहिती मिळाली. तसेच पळवून नेल्याचे घरी सांगितल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन दोघेही पसार झाले. हे दोघेही जुना कौठा भागातील रहिवासी आहेत.

गजानन मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३६३, ५०६.३४ अन्वये सिध्देश्वर काळे व गंगाधर भोकरे यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक अमृता केंद्रे पुढील तपास करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

Intro:नांदेड : शहराततून अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नांदेड : शहरातील महाविद्यालयीन तरुणी शिकवणीला जाते म्हणून घरातून बाहेर गेली ती परतली नाही.तिचा शोध घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात तिला पळविणाऱ्या दोन आरोपींविरुध्द अपहरणाची तक्रार देण्यात आली आहे.Body:शहरातील यशवंतनगर विस्तारित भागातील रहिवासी गजानन मस्के यांची मुलगी व भाऊ किशन मस्के यांची मुलगी २२ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे स्कुटरवरुन घरातून शिकवणीसाठी घराबाहेर गेल्या. शिकवणीसाठी गजाननची मुलगी वर्गात गेली मात्र किशनची मुलगी शिकवणीला आलीच नाही.थोड्या वेळाने तिला लक्षात आले की,बहीण शिकवणीला
व घरीही आली नाही.तेव्हा तिने घरच्यांना सांगितले. बेपत्ता मुलीचा शोध घरच्यांनी घेतला व तिच्या बहिणीलाही विश्वासात घेतले असता तिने सांगितले की,जुना कौठा भागातील सिध्देश्वर काळे व गंगाधर भोकरे यांनी तिला धमकी दिली की,तू जर घरी तुझ्या बहिणीला गाडीसह आम्ही पळवुन नेल्याचे सांगितले तर तुझ्या वडिलांनाच ठार मारतो.त्यामुळे ती भयभीत झाली.Conclusion:याबाबाबत गजानन मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन
भाग्यनगर पोलिसांनी गुरनं २६१/२०१९कलम ३६३,५०६.३४ अन्वये उपरोक्त काळे व भोकरेविरुध्द गुन्हा दाखल करुन पुढील तपास उपनिरीक्षक अमृता केंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.