ETV Bharat / state

नांदेडमध्ये काळ्याबाजारात जाणारा १६ टन तांदूळ जप्त; दोघांना अटक

author img

By

Published : Jan 13, 2020, 10:16 AM IST

ट्रकमधील तांदूळ हा काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणार होता, अशी माहिती समजली आहे. पोलिसांनी ट्रकला ताब्यात घेऊन याबाबत तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. याप्रकरणी तहसील कार्यालयाकडून कारवाई झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

nanded
काळ्याबाजारात जाणारा १६ टन तांदळाचे दृश्य

नांदेड- कुंटूर स्वस्त धान्य दुकानातील तांदळाचा साठा घेऊन काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई शनिवारी कुंटूर पोलिसांनी केली. याप्रकरणी तांदळाची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ट्रकला पोलिसांनी जप्त केले असून ट्रक चालक व क्लिनरला अटक करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम पठाण आणि पोलीस कॉन्सटेबल जी.आर. पांचाळ हे शनिवारी मध्यरात्री गस्तीवर होते. त्यादरम्यान, पोलिसांना हैदराबाद राज्य महामार्गावर आणि नायगाव तालुक्यात असेल्या कृष्णूरच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून एक ट्रक क्र.(एम.एच.३८ डी.४४४४) जाताना दिसला. पोलिसांनी ट्रकचालक इरफान खान सिकंदर खान याच्याशी चौकशी केली आसता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर ट्रकची झडती घेतली असता त्यात १६ टन तांदूळ आढळून आला. पोलीस चौकशीत सदर ट्रकला संगारेड्डीहून कृष्णपूरकडे नेण्यासाठी गाडीमालक शेख अमजद शेख नजीर याने सांगितले असल्याचे ट्रक चालक इरफान खान याने पोलिसांना सांगितले.

सदर ट्रकमधील तांदूळ हा काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणार होता, अशी माहिती समजली आहे. पोलिसांनी ट्रकला ताब्यात घेऊन याबाबत तहसीलदारांना कळविले आले आहे. याप्रकरणी तहसील कार्यालयाकडून कारवाई झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, कुंटूर पोलिसांनी ट्रक चालक इरफान खान सिकंदर खान आणि क्लिनर शेख निसार शेख नजीर (रा. देगलूर नाका टायर बोर्ड नांदेड) या दोघांना अटक केले आहे.

हेही वाचा- विनोद दिघोरेच्या चौकशीवर पोलीस महासंचालकांची नजर

Intro:नांदेड : काळ्याबाजारात जाणारा १६ टन तांदूळ पोलिसांनी पकडला.

नांदेड : कुंटुर स्वस्त धान्य दुकानातील तांदळाचा साठा घेऊन काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला आहे.Body:
नांदेड - हैदराबाद राज्य महामार्गावर आणि नायगाव
तालुक्यात असलेल्या कृष्णूरच्या पंचतारांकित
औद्योगिक वसाहतीतून एक ट्रक जात होता. तेव्हा गस्तीवर असलेले कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम पठाण, पोलीस कॉन्स्टेबल जी.आर. पांचाळ व सदाशिव पाटील यांनी शनिवारी मध्यरात्री हा ट्रक रोखला आणि चालकाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. हा ट्रक ताब्यात घेण्यात आला.त्याचा क्रमांक एम एच ३८ डी ४४४४ असा असून त्यात १६ टन तांदूळ आढळून आला. हा ट्रक संगारेड्डीहून कृष्णूरकडे जात होता.Conclusion:
ट्रक चालकाचे नाव इरफान खान सिकंदर खान व क्लिनर शेख निसार शेख नजीर रा.देगलूर नाका टायर बोर्ड नांदेड असे आहे. गाडीमालक शेख अमजद शेख नजीर-३२ यांनी हा ट्रक संगारेड्डीहून कृष्णूरला घेऊन जा असे चालक इरफानने पोलिसांना दिली. हा ट्रक कुंटूर ठाण्यात
लावून याची माहिती तहसीलदारांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तहसीलच्या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.