नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी 251 कोरोना बाधितांची नोंद झाली असून मागील तीन दिवसातत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1364 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 77 हजार 932 एवढी झाली असून आतापर्यंत 63 हजार 782 रुग्णांना सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या 12 हजार 405 रुग्ण उपचार घेत आहे.
मागील तीन दिवसांच्या कालावधीत 29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 483 जणांचा मृत्यू झाला. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.84 टक्के आहे. जिल्ह्यात आज 1 हजार 364 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 12, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 930, धमार्बाद तालुक्यातंर्गत 23, देगलूर कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यातंर्गत 4, उमरी तालुक्यातंर्गत 32, मालेगाव कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 26, मुखेड कोविड रुग्णालय 56, बिलोली तालुक्यातंर्गत 22, किनवट कोविड रुग्णालय 30, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 15, नायगाव तालुक्यातर्गत 6, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 34, कंधार तालुक्यातंर्गत 15, माहूर तालुक्यातंर्गत 15, लोहा तालुक्यातंर्गत 21, खाजगी रुग्णालय 123 बरे झालेल्या रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 25 खाटा उपलब्ध आहेत.