ETV Bharat / state

तरुणाला बेदम मारहाण, उपचार घेताना जखमी तरुणाचा मृत्यू - आरोपी मनीष बंडुजी भारती

Nagpur Crime News : नागपुरात एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना रामटेक गडमंदिरला जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे. यामध्ये गंभीर दुखापत होऊन तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. विवेक विश्वनाथ खोब्रागडे असं मृत तरुणाचं नाव आहे.

Nagpur Crime News
तरुणाला बेदम मारहाण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 5:33 PM IST

नागपूर Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील सितापार येथे राहणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विवेक हा त्याच्या मित्रासोबत २५ नोव्हेंबरला रात्री रामटेक शोभायात्रा पाहण्यासाठी गेला होता. रात्री साडेआठच्या सुमारास गडमंदिर रामटेकवरुन मोटारसायकलने घरी परत येताना ही घटना घडली आहे.

लाथाबुक्कीने केली मारहाण : आरोपी मनीष बंडुजी भारती आणि त्याच्या मित्रांनी तरुणाची मोटारसायकल रस्त्यावर थांबवली. गाडीला धडक देऊन तुम्ही पळून गेला असं म्हणत आरोपीनं तरुणाला शिवीगाळी करण्यास सुरूवात केली. तसंच विवेक आणि फजान खानला लाथाबुक्कीने मारहाण केली. काही वेळानं फैजानचा भाऊ तेथे आल्यानंतर मनिष भारतीने त्याच्या गाडीचं नुकसान झाल्याचं सांगून फैजानच्या भावाकडून दहा हजार रुपये घेतले.

विवेकचा झाला मृत्यू : फैजान आणि विवेक यांनी घाबरून रामटेक पोलीस स्टेशनला (Ramtek Police Station) तक्रार देण्यासाठी न जाता घरी गेले. त्यानंतर विवेकचा मृत्यू झाला. मारहाणीमुळेच माझा मुलगा विवेक मरण पावला असं वडिलांनी सांगितलं. दिलेल्या तक्रारीनुसार, रामटेक पोलिसांनी कलम 302, 341, 323, 504, 506, 34 भादंविसह कलम 3(२)(V) अनु. जा. अनु जमाती प्रती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक करत आहेत.

आणखी एक धक्कादायक घटना : याआधीही दारू पिण्याच्या वादातून तरूणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली होती. मात्र, उपचारादरम्यान हत्या झालेल्या विजू या तरूणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी फिर्यादी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. मागील 15 दिवसांमधील ही सहावी हत्या झाल्याने नागपूर परिसर हादरला आहे.

हेही वाचा -

  1. खळबळजनक! तरुणाला नग्न करून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
  2. Religious Disputes Rahuri: राहुरीत विशिष्ट समुदायाकडून पुजाऱ्यासह भाविकांना मारहाण; गावात तणावाचं वातावरण
  3. मोबाईल लुटणाऱ्या तरुणांना जमावाकडून बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.