नागपूर - महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पहिले हिवाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) सुरूवात झाली. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ कोतवाली संघाने विधानभवन परिसरात मोर्चा काढला.
राज्यातील महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, अशी मुख्य मागणी संघटनेने केली आहे. तर मागील ४० वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असल्याने प्रत्येक अधिवेशनात हा मोर्चा विधानभावनांवर धडकतो. सरकारने वेळोवेळी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आता लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठिय्या कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. या आंदोलनात राज्यभरातील कोतवाल सहभागी झाले आहेत.
हेही वाचा - पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पूल कोसळला; जीवितहानी नाही