नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली आहे. नागरिकांची कामे आठ दिवसात पूर्ण करा; अन्यथा लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करायला सांगीन, अशा शब्दात परिवहनच्या अधिकाऱ्यांना तंबी दिल्याचे गडकरींनी सांगितले आहे. ते नागपुरात आयोजित एका कार्याक्रमावेळी बोलत होते.
गडकरींनी परिवहन आयुक्तांची एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करताना गडकरी पुढे म्हणाले, आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सरकारी नोकर आहात. मी लोकांमधून निवडून आलो आहे. मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. जर तुम्ही चोरी करत असाल, तर मी तुम्हाला चोरच म्हणणार.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एमआयएससी अंतर्गत ३ दिवससीय लघु उद्योग भारतीचा कार्यक्रम नागपुरात आयोजित करण्यात आला आहे.