गोंदिया - केंद्र शासनाने कृषी विधेयक पारित केलेल्या तीन कायद्याविरुद्ध देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी या कायद्यांना काळे कायदे संबोधून ते रद्द करण्याची मागणी केली आहे. कायदे पारित करताना सरकारने शेतकऱ्यांचे व विविध शेतकरी संघटनेचे मत विचारात घेतले नाही. संसदेत सुद्धा या कायद्याबाबत मतभेद असतांना व विपक्षी दलाने मतदानाची मागणी केली असताना गोंधळात आवाजी मताने ते पारित करण्यात आले. हा कायदा देशातील शेतकरी नकारत आहेत. मग सरकार हे कायदे त्यांच्यावर का लादत आहे?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी उपस्थित केला.
गोंदिया बंद'ला तुरळक प्रतिसाद-
कृषी कायद्याविरोधात काल भारत बंदची हाक देण्यात आली होती. मात्र गोंदिया येथे तुरळक प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. गोंदिया बंद'मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना तर्फे मोर्चा काढत बंदचं आव्हान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी ही या मोर्च्यामध्ये आपली हजेरी लावली.
६ वर्षात देशाची दुर्गती-
यावेळी प्रफुल पटेल म्हणाले की, भारत बंद सर्व शेतकऱ्यांच्या समर्थानात सगळे विरोधी पक्ष आहेत. आज आमच्या देशातील शेतकऱ्यांनी मोदीजींचे सरकार बनविले. मात्र, त्यांनी मागील ६ वर्षात कोणतीही प्रगती केली नाही. मात्र दुर्गती होत चाललेली आहे.
ही लढाई आम्ही जिंकू-
शेतकऱ्यांना फसविण्याचा काम या सरकार ने केले आहे. शेतकऱ्यांचा आवाज आज सर्व देशाचा आवाज आहे. हा आवाज आम्ही आणखी जोरात उचलू धरू व त्यांच्या समर्थानात संपूर्ण भारत बंद आहे. मात्र ही लढाईची सुरवात आहे. ही लढाई आम्ही जिंकू व या सरकारला बाहेर काढून फेकू, असे प्रफुल पटेल म्हणाले.
हेही वाचा- शहांसोबतची शेतकरी नेत्यांची बैठक संपली; तोडगा नाहीचं, उद्या होणारी बैठक सुद्धा रद्द
हेही वाचा- राज्यात ४ हजार २६ नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान, ५३ रुग्णांचा मृत्यू