नागपूर Water Woman Shipra Pathak : राम जानकी यांच्या नावानं प्रतिज्ञा घेऊन अयोध्येतून निघालेली जलस्त्री शिप्रा पाठक यांची पदयात्रा नागपुरात दाखल झाली आहे. जलस्त्री शिप्रा पाठक 'राम जानकी' गेलेल्या जंगलाच्या वाटेवर चालत रामेश्वरमच्या मार्गानं प्रवास करत आहेत. गुरुवारी नागपूरमार्गे त्या वर्धा शहरात जातील, त्यानंतर नाशिक, हुबळी मार्गे रामेश्वरमला पोहचणार आहेत. सुमारे 4 हजार किलो मीटरची त्यांची ही यात्रा असून मार्च महिन्यात त्या रामेश्वरम इथं जलाभिषेक करणार आहेत.
रामनामाची शपथ घेऊन सुरू केला प्रवास : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या भव्य रामल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडं 27 नोव्हेंबरला रामनगरी अयोध्येतून रामनामाची शपथ घेऊन जलमहिला शिप्रा पाठक यांनी राम जानकी वन गमन पदयात्रा सुरू केली होती. सुमारे दीड महिने पायी प्रवास करत ही यात्रा नागपुरात पोहोचली आहे.
![Water Woman Shipra Pathak](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-01-2024/mh-ngp-02-water-woman-shilra-7204462_11012024144933_1101f_1704964773_560.jpg)
रामटेक इथं केला मुक्काम : महाराष्ट्रात प्रवेश करताच त्यांनी रामटेक सिद्ध ठिकाणी ध्यान केलं. इथं प्रभू राम जानकीजी त्यांच्या वनवास काळात राहिल्याची अख्यायिका आहे. भारतात या प्रवासाला सरयू ते सागर असंही म्हणतात. शिप्रा पाठक राम जानकी वन गमन मार्गावर ठिकठिकाणी राम जानकी अध्यात्मासोबतच पर्यावरणासाठी कार्य करत आहेत. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रामटेकच्या संपूर्ण वातावरणात वेगळाचं उत्साह असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
![Water Woman Shipra Pathak](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-01-2024/mh-ngp-02-water-woman-shilra-7204462_11012024144933_1101f_1704964773_952.jpg)
जानकीचे चरित्र म्हणजे मातृशक्तीचा आदर्श : रामभक्त शिप्रा पाठक यांनी "महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची कर्मभूमी आहे" असं सांगितलं. प्रभू राम जानकी यांच्या वनप्रवासाचं मुख्य उद्दिष्ट सांगताना त्या म्हणाल्या की, "माता जानकीचं चरित्र आपण मातृशक्तीचा आदर्श बनवायला हवं. त्यांचं चरित्र प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:ला जुळवून घेते."
![Water Woman Shipra Pathak](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-01-2024/mh-ngp-02-water-woman-shilra-7204462_11012024144933_1101f_1704964773_173.jpg)
12 लाख लावली झाडे : शिप्रा पाठक म्हणाल्या की, "त्यांच्या पंचतत्व संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत देशात सुमारे 12 लाख झाडे लावण्यात आली आहेत. रामभक्तांच्या मदतीनं राम जानकी पथावर राम जानकी वाटिकेचीही स्थापना करण्यात आली आहे."
वाटेतील नद्यांचं पाणी करत आहेत एकत्र : जलस्त्री शिप्रा पाठक यांची पदयात्रा नागपूरहून वर्धा, नाशिक, कर्नाटक, तामिळनाडूमार्गे रामेश्वरमला जाईल. शिप्रा पाठक या वाटेत येणाऱ्या मुख्य नद्यांचं पाणी गोळा करून रामेश्वरममध्ये महादेवाचा जलाभिषेक करणार आहेत. "आजच्या भारताला आपण राममय भारत म्हणू शकतो," असं सांगून शिप्रा पाठक म्हणाल्या की, "सुमारे 1700 किमीच्या पदयात्रेत प्रभू रामाचा प्रचंड उत्साह आहे."
हेही वाचा :