नागपूर - विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. नड्डा यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळ ते दीक्षाभुमी बाईक रॅली काढण्यात आली होती. मात्र, या बाईक रॅलीमध्ये कार्यकर्ते वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याच शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे.
बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या काही कार्यकर्त्यांनी हेल्मेट न घालताच बाईक चालवली आहे. नियम हे फक्त सामान्य माणसांसाठीच असतात काय, असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. सत्तेत असलेल्या पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांवर वाहतूक विभाग कारवाई करते काय हे बघणे महत्वाचे आहे.