नागपूर - नागपुरात रविवारी ६० वर्षापेक्षा जुन्या गाड्या (विंटेज) कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १९०५ ते १९७५ दरम्यानच्या विंटेज कार पाहण्याची संधी नागपूरकरंना मिळाली. गेली ६ दशके जुनी विलीस जीप, ८ दशके जुनी फोर्ड व्ही एट कार, ९५ वर्ष जुनी अग्निशमन दलाची घोडा गाडी आणि १३६ वर्ष जुनी ट्रायमफ सायकल यांचा यामध्ये समावेश होता.
नागपूरच्या सेंट उर्सुला शाळेच्या मैदानावर जणू ऑटोमोबाईल क्षेत्राचा इतिहासाचा उतरला होता. १९०५ ते १९७५ दरम्यानच्या चार चाकी गाड्या आणि दुचाकींसाठी विशेष विंटेज शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नागपूरसह विदर्भातील शंभर जुन्या मात्र आजही सुस्थितीत असलेल्या चारचाकी आणि दुचाकी सहभागी झाल्या होत्या. विलीज ओल्ड, हार्ले डेव्हिडसन, जावा, जेम्स वेस्पा, बॉबी अशा ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित कंपन्या आणि त्यांचे विख्यात मॉडेल या रॅलीच्या माध्यमातून नागपूरकरांना पाहण्याची संधी मिळाली. या विंटेज कारमध्ये सहभागी होण्यासाठी एकच अट होती, ती म्हणजे वाहन सुस्थितीत आणि चालू अवस्थेत असावे. १९५६ ची विलीज जीप १९३५ ची फोर्फ कंपनीची व्ही एट कार, १९७५ ची जावा कंपनीची मोटर बाईक त्याशिवाय एकेकाळी तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी हार्ले डेव्हिडसन आणि जेम्स सेरियल कंपनीच्या मोटर बाईक्स विशेष आकर्षण केंद्र ठरले.