नागपूर - शहराच्या शेजारी असलेल्या इंदिरानगर परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री उशिरा ही घटना समोर आली. दारू पिण्याच्या वादातून या व्यक्तीचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. हिंगणा एमआयडीसी पोलीस मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
शनिवारी मध्यरात्री हिंगणा एमआयडीसी पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नाल्यात पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा मृतदेह एका नाल्यात पडलेला होता व त्यांच्या अंगावर दगड पडलेले होते. या व्यक्तीला दगडाने ठेचून मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एखाद्या कामगाराचा असू शकतो मृतदेह -
हिंगणा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी शेकडो कंपन्या आणि कारखाने आहेत. त्यात हजारो कामगार कामाला आहेत. हा मृतदेहाची वेषभूषा पाहता तो एखाद्या कामगाराचा असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी व सासूवर हल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात