ETV Bharat / state

मेट्रो प्रवास आता अधिक सुलभ! नागपूरकरांसाठी दोन नवे मेट्रो स्टेशन सुरू - नागपूर मेट्रो न्यूज

शहरातील सर्व मेट्रो स्टेशनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे काही मोजकेच स्टेशन सध्या सुरू आहेत. जसजसे स्टेशनचे काम पूर्ण होत आहे तसतसे ते नागपूरकरांच्या सेवेत दिले जात आहेत.

Metro
नागपूर मेट्रो
author img

By

Published : Dec 10, 2020, 7:30 PM IST

नागपूर - अनलॉकनंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हळूहळू वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. त्यात शहरातील मेट्रो देखील सुरू करण्यात आली. त्यामुळे आता नागपुरातील मेट्रो देखील नियमित स्वरूपात धावत आहे. नागपूरकरांच्या सेवेत आता आणखी दोन मेट्रो स्टेशन खुले करण्यात आले आहेत. शहरातील शंकर नगर व रचना नगर ही दोन मेट्रो स्टेशन आजपासून सुरू झाली आहेत. दररोज मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बाब आहे.

नागपूरकरांसाठी दोन नवे मेट्रो स्टेशन सुरू

ही आहेत मेट्रो स्टेशन -

शहरातील सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर या मार्गावरील शंकर नगर व रचना नगर या दोन स्टेशनला मेट्रो प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे शंकर नगरपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रो प्रवास अधिकच सुखद झाला आहे. शहरात आता एकूण १८ मेट्रो स्टेशन सुरू झाले असून १८ ही स्टेशनवरून गाड्या सुटणार आहेत, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

प्रसिद्ध अंबाझरी तलावाचे दिसणार दृश्य -

शंकरनगर ते रचनानगर यादरम्यान प्रसिद्ध अंबाझरी तलाव येतो. त्यामुळे अंबाझरी तलावाचे विहंगम दृश्य हे या मेट्रो प्रवासात नागपूरकरांना अधिकच जवळून अनुभवता येणार आहे. शिवाय इतर स्टेशन प्रमाणे या दोन्ही स्टेशनवर गाडी १५ मिनिटे थांबणार आहे.

पूर्वी सुरू करण्यात आलेली स्टेशन -

यापूर्वी रहाटे कॉलनी, बन्सी नगर, अजनी चौक ही प्रमुख स्टेशन नागरिकांसाठी सुरू करण्यात आली होती. यात अधिक भर घालत नव्या दोन स्टेशनला मेट्रो प्रशासनाकडून परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन्ही स्टेशन भागातील नागरिकांसाठी मेट्रोने प्रवास करणे आता सोपे झाले आहेत. शिवाय पुढील काही दिवसात लोकमान्य नगर मार्गावरील इतरही स्टेशनही नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एकंदरीतच आता हळूहळू का होई ना नागपूरकरांचा मेट्रो प्रवास अधिक सोपा व सुखकर होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.