ETV Bharat / state

लेडी डॉन पिंकी वर्मा खून प्रकरणात दोन आरोपींना अटक - Lady Don murder sagar Uike Arrest

लेडी डॉन पिंकी वर्मा खून प्रकरणात दोन आरोपींना पाचपवली पोलिसांनी अटक केली आहे. सागर उईके आणि अमन मसराम, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Lady Don Pinky Verma accused arrested
लेडी डॉन पिंकी वर्मा खून आरोपी अटक
author img

By

Published : Apr 21, 2021, 6:32 PM IST

नागपूर - लेडी डॉन पिंकी वर्मा खून प्रकरणात दोन आरोपींना पाचपवली पोलिसांनी अटक केली आहे. सागर उईके आणि अमन मसराम, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या पैकी सागर उईकेने पिंकीसोबत कधीकाळी आर्थिक देवाणघेवाण केली होती. या पैशांच्या वसुलीवरून पिंकी सागरला अनेकांच्या समोर बेइज्जत करायची. पिंकीच्या दहशतीमुळे सागर सर्व मुकाट्याने सहन करत होता, मात्र पिंकीचा त्रास असह्य झाल्यामुळे सागरने अमनच्या मदतीने पिंकीचा खून केल्याचा खुलासा झाला आहे.

माहिती देताना डीसीपी लोहित मतानी

हेही वाचा - नागपुरात ऑक्सिजन प्लँटवर 24 तास पोलीस तैनात

पिंकी वर्माला तांडापेठ भागातील नागरिक लेडी डॉन म्हणून ओळखायला लागले होते. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी पिंकी वर्माची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने अनेक वार करून हत्या केली. पिंकी काही कामानिमित्त तांडापेठ परिसरातील तिच्या घरातून बाहेर पडताच आधीच लपून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी तिच्यावर चाकूने सपासप वार केले. पिंकी वर्मा ही रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपी पळून गेले होते. पिंकी नेहमीच सामाजिक कामात रस घेत होती, मात्र समाजसेवेच्या नावाखाली ती काहींना त्रास देखील देत होती. सागर उईके हा तरुण सुद्धा पिंकीच्या नावाने घाबरायचा.

पिंकी सागरला मारहाण करायची

काही महिन्यांपूर्वी पिंकीकडून त्याने काही पैसे उधार घेतले होते. त्यापैकी काही पैसे परत केल्यानंतर पिंकी सागरला येता जाता रस्त्यात अडवायची, त्याला मारहाण देखील करायची, चार चौघात बेइज्जत करत असल्याने सागरने मनात राग धरून पिंकीचा खून करण्याची योजना आखली. सागरने त्याचा मित्र अमनला देखील या कटात सहभागी करून घेतले होते. मंगळवारी पिंकी घराबाहेर पडताच दोघांनी तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला.

२४ तासांत आरोपी अटेकत

पिंकी वर्माचा परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्या काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांसोबत वाद सुरू होता. वस्तीत अवैध दारूची विक्री, तसेच अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या सट्टापट्टीचा अड्डा बंद करण्यासाठी ती धडपडत होती. त्यामुळेच, अवैध धंदे चालवणाऱ्यांनी तिची हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी या खून प्रकरणात अन्य आरोपी सहभागी असल्याचा निष्कर्ष काढून तपास सुरू केला, तेव्हा पिंकी सागरला त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी सागरला ताब्यात घेऊन विचारपूस केली, तेव्हा सागरने मित्र अमनच्या मदतीने पिंकीचा खून केल्याची कबुली दिली.

हेही वाचा - नागपुरात 24 तासात 6890 बधितांची भर, 91 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.