ETV Bharat / state

महापौरांच्या आरोपांना पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचे प्रत्युत्तर

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर नेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला होता. यावर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उत्तर दिले आहे.

tukaram mundhe
तुकाराम मुंढे, आयुक्त नागपूर महानगरपालिका
author img

By

Published : Apr 21, 2020, 10:03 PM IST

नागपूर - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर नेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला होता. यावर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उत्तर दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईड लाईनचे पालन करूनच कोरोना संशयितांची व्यवस्था केली जात आहे. तसेच आमदार निवासाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे प्रत्युत्तर मुंढे यांनी महापौर जोशी यांना दिले आहे.

कोरोना संशयितांना क्वारंटाईन केल्यानंतर शक्य तोपर्यंत एका व्यक्तीला एकाच खोलीत ठेवले जाते. मात्र, एखाद्या खोलीत दोन व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. कोरोना संशयितांच्या जेवणाची आणि सगळी सोय त्यांच्या खोलीतच केली जात आहे. महानगरपालिकेचे अधिकारी 24 तास त्या ठिकाणी लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे लोकांना एकत्र येऊ दिले जात नसल्याचा दावा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. एकदा काही लोकांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता.

संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यामागचा उद्देश आहे की, त्यांच्यापासून इतरांना कोरोनाची लागण होऊ नये. नागपुरात एका व्यक्तीमुळे 50 च्यावर लोकांना लागण झाली आहे. प्रशासनाने त्या संशयित लोकांना आधीच विलग केल्यानेच समूह संसर्ग झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे, असे देखील तुकाराम मुंढे म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.