ETV Bharat / state

गुरूवारी नागपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हजारपार; 13 रुग्णांचा मृत्यू - nagpur corona news

उपराजधानी नागपुरातही कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागपूरच्या पाठोपाठ वर्धातही नव्याने बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गुरूवारी पूर्व विदर्भात 1394 नवीन बाधितांची भर पडली आहे.

thousand number of corona patients thursday in  nagpur
चिंता वाढली! गुरूवारी नागपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हजारपार; 13 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Feb 26, 2021, 8:43 AM IST

नागपूर - पश्चिम विदर्भानंतर आता उपराजधानी नागपुरातही कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागपूरच्या पाठोपाठ वर्धातही नव्याने बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गुरूवारी पूर्व विदर्भात 1394 नवीन बाधितांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण नागपुरात 1116, तर वर्ध्यात 189 रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

रिपोर्ट

प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना -

नागपूर शहरात 826, तर ग्रामीण भागात 228 रुग्णांना कोरोनाची नव्याने लागण झाली आहे. सर्वच स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पाऊले उचलणार असल्याचे सांगितले जात आहे. पण रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे वाढतच आहे. यात नागपूर जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरात 9, तर ग्रामीण भागामध्ये 2 आणि जिल्ह्याबाहेरील 2 मृतकांचा समावेश आहे.

वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू चिंता वाढवणार -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्येत वाढ 2020 या वर्षात सप्टेंबर महिन्यात नोंदवण्यात आली होती. त्यावेळी दररोज हजार पार रुग्ण आढळून येत होते. मागील दोन दिवसात रुग्णसंख्या ही हजार पार असल्याचे आकडेवारीत समोर येत आहे. यात बुधवारी 10 जणांचा मृत्यू असताना गुरुवारी पुन्हा 13 जणांचा मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली असून ही बाब प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

किती चाचण्या किती नवीन रुग्ण -

सध्याच्या परिस्थितीत पाहता नागपूर जिल्ह्यात 10611 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात आर्टीपीसीआरमध्ये 5961, तर अँटिजनमध्ये 4650 नमुने तपासण्यात आले. यात जिल्ह्यात 1116 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. यात 1028 रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने सुट्टी झाली असून यात रिकव्हरी रेट हा 92.12 टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर-वर्धा वाढतीवर -

पूर्व विदर्भात 1394 रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यात नागपुरात 1116, वर्ध्यात 189, चंद्रपूर 42, गोंदिया 24, भंडारा 20, गडचिरोली 3 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्व जिल्ह्यातून 1135 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. यात पूर्व विदर्भात आतापर्यंत 2 लाख 20 हजार 365 रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे कोरोना पॉझिटिव्ह; नागपूरच्या रूग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.