नागपूर - शहराजवळील खडगाव येथे इंडिया वन बँकेचे एटीएम चोरट्यांनी उचलून नेल्याची घटना घडली. या एटीएममध्ये चार लाखांपेक्षा जास्त रक्कम होती. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली.
खडगाव रस्त्यावर इंदिरा नगरजवळ राजू खोब्रागडे यांच्या इमारतीमध्ये इंडिया वन बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी एटीएममधील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम काढता न आल्याने चोरट्यांनी संपूर्ण मशीनच उचलून नेले. एटीएम कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणाही नष्ट केल्याने चोरट्यांबाबत काही सुगावा लागला नाही.
हेही वाचा - रेल्वे प्रवास महागला..! नव्या वर्षात रेल्वेची भाडेवाढ
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील एटीएमही अशाच प्रकारे चोरट्यांनी उचलून नेले होते.