ETV Bharat / state

Sushma Andhare : महिला मुख्यमंत्रीसाठी सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंच्या नावांना सुषमा अंधारेंची पसंती? - Maharashtra Woman CM Discussion

राज्यात महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु झाली ( Supriya Sule Pankaja Munde CM Maharashtra ) आहे. त्यात सुषमा अंधारेंनी स्पष्टच वक्तव्य ( Maharashtra Woman CM Discussion) केले. सुप्रिया ताईंचे नाव आहे. पंकजा ताई मुंडेंची नावे घेतली आहेत.

Sushma Andhare
सुषमा अंधारे
author img

By

Published : Dec 2, 2022, 4:24 PM IST

नागपूर : उद्धव ठाकरे यांनी राज्यात महिला मुख्यमंत्री यासंबंधी सूतोवाच केल्यानंतर राज्यात महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु झाली ( Supriya Sule Pankaja Munde CM Maharashtra ) आहे. यासाठी शिवसेनेच्या अनेक महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात नुकत्याच शिवसेनेत पदार्पण झालेल्या सुषमा अंधारेंचंही नाव येत आहे. मात्र या शक्यतांवर सुषमा अंधारेंनी स्पष्टच वक्तव्य ( Maharashtra Woman CM Discussion) केले. नागपुरात त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांना पसंती? : महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पदी विराजमान होणाऱ्या कोणत्या नेत्या आहेत, यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी दोन नावे घेतली. त्या म्हणाल्या, यात सुप्रिया ताईंचे नाव आहे. पंकजा ताई मुंडेही चांगले वाटते. शिवसेनेतही अनेक महिला वाटतात, ज्या या पदावर बसू शकतात. एवढ्या सिनियर लोकांमध्ये मी या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक शिपाई म्हणून काम करायला आवडेल असेही त्या म्हणाल्या.

मी मनातले मांडे खाणाऱ्यांपैकी नाही : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘जर एकिकडे यूपीत एखादी महिला पाच वेळा मुख्यमंत्री होत असेल तर महाराष्ट्रात अशी मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही. ती संधी कुणाला द्यायची, हे पक्षप्रमुख ठरवलीत. मी मनातले मांडे खाणाऱ्यांपैकी नाही. राज्यात इतरही अनुभवी महिला नेत्या आहेत. त्या मुख्यमंत्री झालेल्या मला आवडेल. मी पक्षात सध्या शेंडेफळ असून पक्ष बांधणी हेच सध्याचं उद्दिष्ट असल्याचे अंधारे म्हणाल्या. तसेच मला पक्षाची बांधणी करायची आहे. जहाँ हू बहोत चैन से हूं...जगू द्या..अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? : मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले होते. शिवशक्ती, भीमशक्ती, लहूशक्ती एकत्र आल्यास आपण महाराष्ट्रात एक ताकदवान सरकार आणू. सक्षम मुख्यमंत्री या पदावर बसवू. मग ती महिला असेल किंवा पुरूष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात कोण असेल तो महिला मुख्यमंत्र्याचा चेहरा, यावरून चर्चा सुरु झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.