ETV Bharat / state

ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो; सुधाकर बडगुजर यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण - Salim Kutta Sudhakar Badgujar

Salim Kutta : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. त्यांनी या दोघांच्या पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवले.

Nitesh Rane
Nitesh Rane
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 5:08 PM IST

Updated : Dec 15, 2023, 5:27 PM IST

पाहा काय म्हणाले नितेश राणे

नागपूर Salim Kutta : शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे. सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर असताना त्यानं बडगुजर यांच्यासोबत पार्टी केल्याचं नितेश राणेंनी म्हटलं. सलीम कुत्ता हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील एक प्रमुख आरोपी आहे.

पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवले : नितेश राणे यांनी या दोघांच्या पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवले. विधानसभेतील चर्चेदरम्यान नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. "मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर याचे संबंध काय? सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टी करताना दिसत आहेत. बडगुजर यांना कोण पाठिशी घालतंय? त्यांचा पॉलिटीकल गॉडफादर कोण? या प्रकरणाची चौकशी व्हावी", अशी मागणी नितेश राणेंनी सभागृहात केली.

सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण : नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर आता सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय. वेगळ्या विदर्भाची मागणीसाठी सभा होती आणि त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल केले होते. माझ्यासह अनेक लोक जेलमध्ये होते. त्यावेळी बॉम्ब स्फोटातील आरोपीपण जेलमध्ये आहेत हे आम्हाला माहिती नव्हते. माझ्यावर एक साधी 'एनसी'सुद्धा दाखल नव्हती. राजकीय हेतुनं प्रेरित होऊन गुन्हे दाखल केले होते. सलीम कुत्ता याला 93 मध्ये अटक केली होती. त्यामुळे ते कैदी म्हणून होते. बेबनाव केला आहे तसेच व्हिडिओमध्ये मॉर्फिंग केले आहे. त्यामुळं सलीम कुत्ता याच्यासोबत माझे संबंध नाहीत, असं स्पष्टीकरण सुधाकर बडगुजर यांनी दिलंय.

एसआयटी चौकशीचे आदेश : यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत, यावर एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. "दाऊदचा साथीदार जर पॅरोलवर बाहेर येऊन राजकीय नेत्यासोबत पार्टी करत असेल, तर हे गंभीर आहे. या लोकांना पार्टीपेक्षा आणखी काय महत्त्वाचं आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल", असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

दादा भुसेंची टीका : या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदारही आक्रमक झाले. नाशिक जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे यांनी या फोटोवरुन ठाकरे गटावर जोरदार टीका केली. "सुधाकर बडगुजर यांचे कोणाशी लागेबांधे आहेत? अशा देशद्रोह्यांसोबत पार्टी कोणी केली? अतिरेक्यांना पैसा कोण पुरवतंय? याची चौकशी झाली पाहिजे", असं दादा भुसे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. शिवसेना आमदार अपात्र प्रकरण; निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकरांना मुदतवाढ, वाचा नवीन तारीख काय
  2. विधिमंडळ अधिवेशन 2023 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी तळली भजी, बेरोजगारीकडं वेधलं लक्ष

Last Updated : Dec 15, 2023, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.