ETV Bharat / state

Son Killed Mother : धक्कादायक! मुलानं केली आईची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का... - Nagpur Police

Son Killed Mother : नागपुरात खळबळजनक घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची शस्त्राने वार करुन हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करण्यामागचे कारण आता समोर आले आहे.

Nagpur Crime News
आईची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 10:58 PM IST

नागपूर : Son Killed Mother : नागपुरात आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शहरातील यशोधरानगर पोलीस स्टेशन (Yashodhara Nagar Police Station) हद्दीत एका मुलाने जन्मदात्या आईची हत्या केली आहे. आईला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या व्याधीने ग्रासले होते. उपचारावर अधिकचा खर्च होत असल्याने मुलाने आईच्या गळ्यावर शस्त्राने वार करून हत्या (Nagpur Crime) केली. दुर्गा रतन मेश्राम असे मृत महिलेचे नाव आहे. तर अंकित मेश्राम असे आरोपीचे नाव आहे.

दुर्गा मेश्राम होत्या आजारी : दुर्गा मेश्राम या नागपुरातील संजय गांधी नगरमधील गोंड मोहल्ला येथे मुलगा अंकितसोबत राहत होत्या. त्यांना लकवा, बीपी, शुगरचा आजार असल्याने त्यांना बोलता येत नव्हते. दुर्गा या घरी मृतावस्थेत पडलेल्या आहेत अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी कळवली होती, अशी माहिती यशोधरानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भेदोडे यांनी दिली.

अंकित मेश्रामला अटक : सुरुवातीला नातेवाईकांनी दुर्गा यांच्या घरी जाऊन बघितले असता, त्याच्यावर शस्त्राने गालावर, गळयाजवळ वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तात्काळ तपासचक्र फिरवले. तर आरोपी हा दुसरा तिसरा कुणीही नसून, दुर्गा यांचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी अंकित मेश्रामला अटक केली आहे.

नागपुरात गुन्हेगारी वाढली : नागपूर शहर आणि जिल्ह्यात खून, दरोडे, मारामारी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील महिन्यात एकाच आठवड्यात नागपुरात चार खुनाच्या घटना घडल्या होत्या. तसेच एका भाजपा महिला पदाधिकाऱ्याचीही हत्या झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागपूर पोलिसांसमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

हेही वाचा -

Murder in Union Ministers House : केंद्रीय मंत्र्यांच्या घरात एकाची हत्या, मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप

BJP Women Officer Murder : भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या हत्ये प्रकरणी माहिती देणाऱ्याला नागपूर पोलीस देणार एक लाखांचे बक्षीस

Nashik Crime : भरबाजारपेठेत भाजी विक्रेत्याचा सपासप वार करून खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.