ETV Bharat / state

Robots For Cleaning : मॅनहोलच्या स्वच्छतेसाठी स्मार्ट सिटी करणार रोबोट खरेदी - नागपूर स्मार्ट सिटी

शहरातील गडर, मॅनहोल्सची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी ( to clean manholes) कामगारांना मॅनहोल्स मध्ये उतरावे लागु नये यासाठी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे रोबोट खरेदी (Smart City will buy robots) करण्यात येणार आहे. नागपूर स्मार्ट सिटीच्या (Nagpur Smart City) संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. यामुळे नागपूर शहरातील सफाई कामगारांच्या समस्येवर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

Nagpur Smart City
नागपूर स्मार्ट सिटी
author img

By

Published : Jun 18, 2022, 2:02 PM IST

नागपूर: नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मॅनहोल्सच्या देखभालीमध्ये अधिक सुरक्षितता आणण्यासाठी हा उपक्रम नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने राबवला जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. उपस्थित होते तर स्मार्ट सिटीचे मेंटॉर आणि चेअरमन डॉ. संजय मुखर्जी मुंबईहुन उपस्थित होते.

नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले की, सध्या केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे १० जेटींग मशीन आणि ४ सक्शन मशीन (Suction machine) आहेत त्याच्या सहाय्याने मोठ्या रोडवर सिवर चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते पण लहान रोडवर हे करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत होणार आहे.

आई.ओ.टी. वर आधारित हे स्कॅव्हेंजिंग रोबोट लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्ये सुद्धा सिवर चेम्बरच्या स्वच्छेतेत मदत करेल, असेही त्यांनी सांगितले. नागपूर स्मार्ट सिटीतर्फे हुडकेश्वर-नरसाळा भागात पोहरा नदीवर २० एम.एल.डी. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. संचालक मंडळाने हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. या माध्यमातून पोहरा नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या प्रयत्न आहे, असे गोतमारे यांनी सांगितले.

हेही वाचा : Ssc Board Result: दहावीत मनपा शाळांचा निकाल ९९.३१ टक्के; २२ शाळांचा निकाल शंभर टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.