ETV Bharat / state

Bageshwar Dham : मला 40 वर्षांपासून धमक्या मिळत आहेत, मी धमक्यांना भीक घालत नाही - श्याम मानव

author img

By

Published : Jan 23, 2023, 4:44 PM IST

Updated : Jan 24, 2023, 7:20 AM IST

माझ्या कामात मला धमक्या गेल्या ४० वर्षांत सतत मिळत असून मला 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते या संदर्भात योग्य काळजी घेतील अशा शब्दात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी आज (सोमवारी) प्रतिक्रिया दिली आहे.

Shyam Manav Reaction On Killing Threat
श्याम मानव

मिळालेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना श्याम मानव

नागपूर: नाशिकमध्ये सोमवारी साधुसंतांनी अंधश्रद्धा विरोधी कायदा रद्द करावा याकरिता आंदोलन केले आहे. मुळात हा कायदा रद्द करायचा असेल तर बागेश्वर धामचे मुख्य पंडित धिरेन्द्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरात येऊन दिव्यशक्ती सिद्ध करावी. यानंतर हा कायदा आपोआपच रद्द होऊ शकतो असे देखील ते म्हणाले आहेत. श्याम मानव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली जात होती. मात्र, त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आता सुरक्षा ताफ्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांसह एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी विशेष सुरक्षा पथकाच्या दोन जवानांसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा सुरक्षेत समावेश असायचा. मात्र आता ही संख्या सातवर गेलेली आहे.

श्याम मानव यांच्या सुरक्षेची काळजी : बागेश्वर धामचे मुख्य पूजारी पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्रींना श्याम मानव यांनी थेट आव्हान दिले होते. त्यामुळे काही दिवसांपासून आव्हान- प्रतिआव्हानाची लढाई ही वाढतच जात आहे. सध्या श्याम मानव हे नागपूरच्या रवी भवन येथील कॉटेज क्रमांक 16 मध्ये मुक्कामी आहेत. ते पुढील काही दिवस नागपुरातच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्यानंतर काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत. श्याम मानव यांना भेटण्यास येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करून चौकशी केली जात आहे.

धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारले आव्हान : धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख देऊ असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आले होते. त्यानंतर पंडित धीरेंद्र कुमार शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली होती. दिव्य शक्तीचा दावा शास्त्री नेहमीच करत असतात. त्यांचा हाच दावा सिद्ध करायचा असेल तर फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन खालीच खाली करता येईल. त्यासाठी पंडित धिरेंद्र कृष्णा शास्त्रींनी त्यांच्या सोयीने नागपुरात यावे. त्यांची संपूर्ण व्यवस्था ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केली जाईल, असेदेखील श्याम मानव यांनी स्पष्ट केले होते.

बाबांवर आरोप काय? : मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या नावाची केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. नागपुरात रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता. 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक होत असून, महाराजांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे केली आहे. श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना आव्हान दिले होते. त्यांनी आमच्यामध्ये दैवी चमत्कारी दरबार आयोजित करावा, सर्व सत्य सांगाल तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये भेट देऊ.

हेही वाचा : Nashik : साधू महंतांचे आंदोलन! अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्रातून रद्द करण्याची मागणी

Last Updated : Jan 24, 2023, 7:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.