नागपूर - आंध्रप्रदेश सरकारने बलात्कार प्रकरणातील आरोपींना तत्काळ शिक्षा होईल या दृष्टीकोनातून दिशा कायदा तयार केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील असा कायदा तयार करावा, या संदर्भात शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - 'महापौर संदीप जोशींवर झालेल्या गोळीबाराची चौकशी व्हावी'
विधी आणि न्याय विभागासह मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात सखोल चर्चा केली जाईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे मनिषा कायंदे यांनी सांगितले आहे.