नागपूर - राज्यात भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्यावतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात नागपुरातील अमृत भवन येथे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यात एकाच वेळी 40 वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हास्तरावर शिवगान स्पर्धा घेण्यात आली. यात अंतिमफेरी 19 फेब्रुवारी अजिंक्यगड सातारा येथे होणार आहे. या प्रथम फेरीतून राज्यस्तरीय स्पर्धेतसाठी स्पर्धकांची निवड केली जाणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपक्रम -
महाराष्ट्रात एकाच वेळी 40 वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आली. नाट्याचे आद्य प्रणेते भरत मुनींच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगान स्पर्धा घेण्यात आली आहे. जिल्हास्तरावर घेण्यात आणलेल्या नागपूर शहरात प्रथम फेरी घेण्यात आली आहे. या फेरीतून प्रथम येणाऱ्या मानकरी स्पर्धकांना वैक्तिक आणि सांघिक स्तरावर होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे. अजिंक्यगड सातारा येथे अंतिम फेरी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन राज्यभर जिल्हास्तरावर एकाच वेळीं आयोजन भाजपच्या सांस्कृतिक आघाडीकडून करत महाराष्ट्रात पहिल्यांदा हा उपक्रम राबविला जात आहे.
हेही वाचा - बीड: स्पोकन इंग्लिशच्या क्लासकरता गेलेल्या तरुणीची पुण्यात आत्महत्या
शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर -
महाराष्ट्रात प्रथमच अशा पद्धस्तीने राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली आहे. शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली होती. शिवसेनेला हिंदुत्वाचा, शिवगानचा पडलेला विसर पाहता याच धर्तीवर भाजपच्या सांस्कृतिक आघाडीकडून शिवगान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे भाजपच्या सांस्कृतिक आघाडीचे नागपूर शहर अध्यक्ष अभय देशमुख यांनी सांगितले.
शिवचरित्र इतिहास डोळ्यांपुढे उभी करणारी स्पर्धा -
शिवगान स्पर्धा वयक्तिक आणि सांघिक स्तरावर घेण्यात येत आहे. यात 12 वर्षांवरील कोणालाही सहभागी घेता आला आहे. या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवरायांवरील पोवाडा, पाळणा शिवस्फूर्ती गीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आधी प्रकारच्या गीतांचा समावेश स्पर्धेत असणारा आहे. या माध्यमातून महाराजांचे इतिहास पोवाडा आणि गीतांच्या माध्यमातून डोळ्यापुढे उभा केला जाणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर राज्यस्तरीय बक्षीस वितरण केले जाणार आहे.
नव्या पिढीला इतिहास सांगत व्यासपीठ देणारा उपक्रम -
नवीन पिढीला शिवाजी महाराजांचा पराक्रम त्याचे जीवनमान, हिंदवी स्वराजाच्या इतिहास या शिवगान स्पर्धेच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. यासोबतच नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत या माध्यमातुन शिवाजी महाराज कालीन पोवाडा या कलेचे जतन करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.