नागपूर- शहरात सायकल प्रेमींसाठी एक स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात आला आहे. नागपूर मनपाच्या स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून ६ किमी लांब सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात येणार आहे. नागपूर पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते ट्रॅकच्या कामाला सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाच्या इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमाअंतर्गत या ट्रॅकची निर्मिती करण्यात येणार आहे.
नागपूरात सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र ट्रॅकची निर्मिती
शहरात एकूण 18 किलोमीटर सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. पहिल्या सहा किलोमीटरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यासमोरच्या मार्गावर हे ट्रॅक तयार करण्यात आला आहे. शापूरजी - पॉलनजी कंपनीकडून प्राप्त सी.एस.आर निधितून सायकल ट्रॅकच्या निर्माण करण्यात येणार आहे.
नागपूर; सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र ट्रॅकची निर्मिती नवीन रस्त्याच्या आराखड्यात सायकल ट्रॅकची तरतूद....कोविड-१९ च्या काळात नागरिकांनी मोठया प्रमाणात सायकलचा वापर केला. शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी सायकल चालवणे चांगला व्यायाम आहे. शिवाय पर्यावरणाला याचा मोठा फायदा होतो. सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी वेगळी जमीन संपादन करण्याची गरज नसून नवीन रस्त्याचे निर्मिती आराखड्याच यासाठी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली.
नागपूर; सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र ट्रॅकची निर्मिती निरोगी शरीर आणि प्रदूषण मुक्त शहर.....इंडिया सायकल्स फार चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत सायकल चालविणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी याची मदत होणार आहे. तसेच जास्तीत- जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा, असे आवाहन भुवनेश्वरी यांनी केले आहे. निरोगी शरीर आणि प्रदूषण मुक्त शहर ठेवण्यास फायदा होईल स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस म्हणालात.
या भागात होणार सायकल ट्रॅकची निर्मिती- प्रथम चरणामध्ये रामगिरी - लेडीज क्लब - लॉ कॉलेज चौक - महाराजबाग - विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान - जपानी गार्डन - रामगिरी या . लॉ कॉलेज चौक, भोले पेट्रोल पंप, महाराजबाग, वीसीए, जपानी गार्डन, टीव्ही टॉवर, वासुसेना नगर, फुटाळा तलाव, वॉकर्स स्ट्रीट, लेडीज क्लब लॉ कॉलेज या मार्गावर ट्रॅकची निर्मिती करण्यात येणार आहे.