ETV Bharat / state

मान-पानाच्या नाट्यात सरपंचानी लसीकरण मोहीम पाडली बंद.. आरोग्य कर्मचाऱ्यांना केली मारहाण - सरपंचाने लसीकरण मोहीम थांबवली

कोरोनाचा धोका पुन्हा वाढीस लागल्यानंतर सर्वच लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्याच्या नारखेडे तालुक्यातील खंडाळा आरोग्य केंद्रावरील एका सरपंचाने जोरदार धिंगाणा घालत लसीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सरपंचाविरोधात पोलिसात शिवीगाळ आणि मारहाण करण्याची तक्रार दाखल करण्यात आलेली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

corona vaccination campaign
corona vaccination campaign
author img

By

Published : Jan 5, 2022, 5:18 PM IST

Updated : Jan 5, 2022, 5:29 PM IST

नागपूर - कोरोनाचा धोका पुन्हा वाढीस लागल्यानंतर सर्वच लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्याच्या नारखेडे तालुक्यातील खंडाळा आरोग्य केंद्रावरील एका सरपंचाने जोरदार धिंगाणा घालत लसीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मला न विचारता, कुणाच्या परवानगीने इथे लसीकरण करता असे म्हणत त्या सरपंचाने आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. रुपेश मुंदाफळे असे या सरपंचाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी सरपंच रुपेश मुंदाफळे विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी सरपंचाला अटक केली आहे.

सरपंचाची आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण

देशात आणि राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 15 ते 18 वर्ष वयोगटातील तरुण वर्गासाठी लसीकरण मोहीम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून तरुण वर्गाने सुद्धा लसीकरणाला मोठा प्रतिसाद दिल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र लसीकरण का करता म्हणत लसीकरण केंद्रावर जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा एक धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील भिष्णूर आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या खंडाळा गावात समोर आला आहे. खंडाळा गावाचे सरपंच रुपेश मुंदाफळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

लसीकरण मोहिमेला सरपंचाच्या परवानगीची गरज नाही -

लसीकरण मोहीम हा भारत सरकारचा उपक्रम असून यासाठी पंचायत समिती आणि खंडविकास अधिकारी परवानगी देत असतात. भारत सरकारने लसीकरण मोहीम राबवा, असे आदेश दिल्यानंतर इतरांच्या परवानगीची यासाठी आवश्यकता नसते. असे असताना सुद्धा खंडाळा गावाचे सरपंच रुपेश मुंदाफले यांनी कोणाच्या परवानगीने तुम्ही शिबिर आयोजित केले, असा सवाल उपस्थित करत आरोग्य विभागातील कर्मचारी प्रवीण धोटे, नितीन रेवतकर यांना शिवीगाळ करीत मारहाण केली आहे.

सरपंचाविरुद्ध पोलिसांत तक्रार - डॉ. गायकवाड

नरखेड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सरपंचाविरोधात पोलिसात शिवीगाळ आणि मारहाण करण्याची तक्रार दाखल करण्यात आलेली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आम्ही राष्ट्रीय सेवा कार्य करत असताना सरपंचाने अशा प्रकारे वागून डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण होत असल्याची भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : Jan 5, 2022, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.