नागपूर : मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नागपूर महानगर पालिकेवर वरात मोर्चा काढण्यात आला होता. पाणीपुरवठा करणारी ओसीडब्ल्यू कंपनीचा अनेकदा भांडाफोड केला. कंपनीचे गैरकारभार ते बाहेर आणल्यानंतर सुद्धा त्या कंपनीला अभय का मिळत आहे? ती कंपनी की भारतीय जनता पार्टीची गर्लफ्रेंड आहे का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. एका ठिकाणी भाजप ओरडून सांगणार की, आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत. आम्ही भ्रष्टाचार होऊ देणार नाही. तर दुसरीकडे कंपनीला खायला आणि प्यायला घालायचे अशी दुटप्पी भूमिका भाजपची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तर राऊत बंधूंचे कनेक्शन पुढे येईल : माझ्यावर झालेल्या हल्ल्यात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या हल्ल्याचा कट रचला गेला तो निलेश पराडकर अजूनही फरार आहे. निलेश पराडकर उद्धव ठाकरे गटाचा माथाडी कामगार सेनेचा पदाधिकारी आहे. तो सुनील राऊत आणि संजय राऊत यांच्या जवळचा आहे. पराडकर वर कुणाचा वरदहस्त आहे. जेंव्हा पराडकरला पकडतील तेंव्हा राऊत बंधूंचे कनेक्शन समोर येईल असा दावा, संदीप देशपांडे यांनी केला आहे.
सुपारी देऊन हल्ले केले जातात : जर उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. बाळासाहेब ठाकरे असताना सामोरा- सामोर हल्ले व्हायचे, पण आता त्यांच्याकडे कार्यकर्ते उरले नसल्याने हे असे मागून हल्ले करतात, सुपारी देऊन हल्ले करतात, मयूर शिंदेच्या प्रकरणात काय ते समोर आले आहे.
तीन मार्चला झाला होता हल्ला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर बॅट आणि स्टंपने तीन मार्चला हल्ला झाला होता. मॉर्निंग वॉक करत असताना हा हल्ला झाला होता. हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात खंडणी विरोधी पथकाने आता तिसऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. विकास चवरिया असे या आरोपीचे नाव असून त्याचा हल्ल्याच्या कटात सहभाग होता.
हेही वाचा -