ETV Bharat / state

Draupadi Murmu Nagpur visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईकडे प्रस्थान, उद्या शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे घेणार दर्शन - द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. बुधवारी त्यांच्या हस्ते नागपूरच्या कोराडीतील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते.

Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
author img

By

Published : Jul 6, 2023, 9:31 AM IST

Updated : Jul 6, 2023, 1:14 PM IST

नागपूर : नागपूर, गडचिरोली येथील विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीन दिवसांच्या दौर्‍यानंतर गुरुवारी मुंबईकडे प्रस्थान केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ४ जुलैला सायंकाळी नागपुरात आगमन झाले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी कोराडी येथील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आज निरोप देण्यात आला. राज्यपाल रमेश बैस ,पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी यावेळी विमानतळावर उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मू या उद्या शिर्डी दौऱ्यावर असणार- देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उद्या शिर्डी दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रपती उद्या शिर्डीत येणार असुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनासह साई संस्थानने जय्यत तयारी केली आहे. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आतापर्यंत सात राष्ट्रपतींनी हजेरी लावली आहे. साईबाबांच्या समाधीच्या दर्शन घेणाऱ्या मुर्मू या सातव्या राष्ट्रपती असणार आहेत. या आधी निलम संजीव रेड्डी, शंकरदयाळ शर्मा, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद यांनी देखील शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. दि 7 जुलै शुक्रवारी रोजी राष्ट्रपती मुर्मू विशेष विमानाने दुपारी शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहेत.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या उद्या जवळपास तीन तास शिर्डीत उपस्थित राहणार आहेत. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावून त्या साईसमाधीवर पाद्यपूजा करणार आहेत. त्यानंतर साईबाबांच्या आगमनाची स्मृती जपणार्‍या गुरुस्थान मंदिर व निंब वृक्षाला भेट देऊ दर्शन घेणार आहेत. त्यानंतर बाबांचे आयुष्यभर जेथे वास्तव्य घडलं त्या सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या द्वारकामाईतही त्या नतमस्तक होणार असल्याचेही सांगण्यात येते. साईबाबांनी वापरलेल्या वस्तू, कपडे, पादत्राणे, रथ, पालखी, साईबाबांच्या ओरीजनल प्रतिमा जतन करून ठेवण्यात आलेल्या साईबाबा वस्तुसंग्रहालयालाही त्या भेट देण्याची व साईबाबांचे जीवनचरित्र समजावून घेण्याचीही शक्यता आहे. यानंतर त्या साईसंस्थानच्या प्रसादालयात भोजन करणार आहेत. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 7 जानेवारी 2009 रोजी या प्रसादालयाचे उद्घाटन केलेले आहे.

दीक्षांत समारंभात द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या : गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या १० वा दीक्षांत समारंभाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रमुख पाहुण्या होत्या. आज त्या वर्ध्याला भेट देतील आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावणार आहेत. राष्ट्रपती त्यांच्या नागपुरातील वास्तव्यादरम्यान साहित्य, समाजसेवा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींशी संवाद साधणार आहेत.

राष्ट्रपती प्रथमच महाराष्ट्रात : राष्ट्रपती मुर्मू यांचे मंगळवारी सायंकाळी वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले होते. त्या बुधवारी सकाळी साडेदहा वाजतका हेलिकॉप्टरने गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाची प्रशासकीय इमारत व परीक्षा भवनाचा शिलान्यास तसेच विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारंभात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रपती प्रथमच महाराष्ट्रात येत असल्याने आवश्यक, पूरक व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच शहरात यावेळी सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला दिसत आहे. द्रौपदी मुर्मू यांचे आगमनानंतर नागपूर येथील राजभवनात त्यांचे स्वागत करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, आशिष जायस्वाल हे उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Draupadi Murmu : संस्कृती आणि राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण
  2. Draupadi Murmu on Vidarbha Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आजपासून 3 दिवस विदर्भ दौऱ्यावर, गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी
  3. Murmu on Vidarbha Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपुरात आगमन; गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी

Last Updated : Jul 6, 2023, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.