नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या, सावनेर पोलीस ठाणे पथकाने बनावट तंबाखू तयार करण्याच्या कारखान्यावर धाड (Police action on fake tobacco manufacturing factory) टाकली आहे. पोलिसांनी एकूण 17 लाख रुपये किमतीचा बनावट तंबाखु (factory seized goods worth lakhs of rupees) जप्त करून चार आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करून, अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कारखाना लोकांचा नजरेतून दूर शेतातील घरात सुरू होता. Tobacco Manufacturing Factory Seized
गुप्त माहितीनुसार केली कारवाई : अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी सावनेर पोलिसांचे पथक ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान पाटणसावंगी परिसरारातील खापा हद्दीत मौजा वेलतूर शिवारात शिवाजी वाट यांच्या शेतातील घरात बनावट तंबाखू तयार करण्याचा कारखाना सुरू आहे, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्याआधारे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून धाड टाकण्यात आली. त्यावेळी 17 लाख किमतीचा बनावट तंबाखू जप्त करण्यात आला. यामध्ये पॅकिंग झालेला 152 किलो तंबाखू जप्त करण्यात आला असून; त्याचे बाजारमूल्य 7 लाख 10 हजार रुपये इतके आहे. तर 195 किलो खुला तंबाखू जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 9 लाख 11 हजार रुपये इतके आहे. या शिवाय 3 लाख रुपये किमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
![Tobacco Manufacturing Factory Seized](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16997115_t-2.jpg)
शेतातील घरात सुरू होता कारखाना : बनावट तंबाखू तयार करण्याचा कारखाना हा पाटणसावंगी परिसरारातील खापा हद्दीत, मौजा वेलतूर शिवारात शिवाजी वाट यांच्या शेतातील घरात सुरू होता. शेतातील घरात नेमका काय उद्योग सुरू आहे, हे लोकांच्या नजरेतुन लपून राहावे याकरिता आरोपींनी ही शक्कल लढवली होती. Tobacco Manufacturing Factory Seized