नागपूर Online Gaming Fraud Case : या प्रकरणात नवीन एक गुन्हा दाखल करण्यात आला असून गोंदिया येथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. तिन्ही लॉकर (Sontu Jain bank locker) पूर्णपणे भरले होते. त्यात एवढी रक्कम लपवण्यात आली होती. (Sontu Jain Case) २ किलो सोने आणि ७० लाख रुपयांची मोजणी आता पर्यंत झाली आहे. लॉकरमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात रक्कम असून त्याची मोजणी सुरू आहे. (Nagpur Crime)
बँक मॅनेजरला अटक : जुलै महिन्यात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर सोंटूचे बँक लॉकर सिझ करण्यासाठी बँकेला पत्र दिले होते. त्यानंतर सोंटू जैनच्या नातेवाईक कुटुंबातील सदस्यांनी बँक मॅनेजर आणि काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आणखी ३ नवीन लॉकर गुपचूप पद्धतीने उघडले. या कामात सोंटूच्या दोन डॉक्टर मित्रांनी सुद्धा त्याला मदत केली.
काय आहे प्रकरण समजून घ्या : कमी वेळेत भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवून आरोपी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याने ऑनलाईन गेमिंग अॅपच्या मदतीने नागपूर येथील एका व्यापाऱ्याची ५८ कोटी रुपयांनी फसवणूक केली होती. हे प्रकरण नागपूर शहर पोलिसांपर्यंत गेल्यानंतर आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन दुबईला पळून गेला होता. पोलिसांनी चारही बाजूने कोंडी केल्यानंतर सोंटू अटकपूर्व जामीन मिळवत भारतात परतला होता; परंतु मंगळवारी न्यायालयाने त्याचा जमीन रद्द केला. त्यामुळे त्याने पोलिसांच्या समोर हजर होणे अपेक्षित होते. मात्र तरीही तो पळून गेला होता. लपण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर त्याने नागपुरात न्यायालयात शरणागती पत्करली.
यापूर्वीसुद्धा कोट्यवधी रुपयांचे घबाड जप्त : या प्रकरणा संदर्भात नागपूर पोलिसांनी २२ जुलै रोजी गोंदिया येथे सोंटू जैनच्या घरी धाड टाकून तब्बल १६ कोटी ८९ लाखांची रोकड, १२ किलो ४०३ ग्रॅम सोनं आणि २९४ किलो चांदी असा २७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर गोंदिया मधील काही बँक लॉकरमधूनही ४.५४ कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती. आतापर्यंत जप्त मुद्देमालाची किंमत ३१ कोटी रुपये इतकी झाली होती.
हेही वाचा:
- Online Game Fraud Case : ऑनलाइन गेम फसवणूक प्रकरण; आरोपी सोंटू जैनच्या अडचणी वाढणार
- Businessman Online Game Cheating: ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्याची फसवणूक; बुकीच्या घरातून करोडोंचे घबाड जप्त
- Solapur Drugs Factory : उडता सोलापूर; पुणे राष्ट्रीय महामार्गावर सहा कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त, ड्रग्ज तस्करांना पोलीस कोठडी