ETV Bharat / state

वीज विभागातील कर्मचारी हे माझे कुटुंब - ऊर्जामंत्री नितीन राऊत - नितीन राऊत

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे.

one lakh employees working in the power department is my family  said nitin raut
वीज विभागात काम करणारे सुमारे एक लाख कर्मचारी हे माझे कुटुंब आहे- ऊर्जामंत्री नितीन राऊत
author img

By

Published : Nov 14, 2020, 3:43 PM IST

नागपूर - गेल्या वर्षभरात राज्यावर आलेल्या सर्व संकटाच्या काळात वीज विभागातील कर्मचारी मोठ्या धैर्याने कर्तव्य बजावत आहे. या कोरोना काळात वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र जनेतची सेवा केली. त्यानंतरही दिवाळी बोनस न मिळाल्याने संतप्त झालेल्या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाची हाक दिली होती. मात्र, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे. वीज विभागात काम करणारे सुमारे एक लाख कर्मचारी हे माझे कुटुंब आहे. त्या सर्वांची काळजी घेणे कुटुंब प्रमुख म्ह्णून माझी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना नाराज करून कामकाज करणे शक्य नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या असल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

ऐन दिवाळीच्या दिवशी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी लायटिंग स्ट्राईक करण्याचा इशारा दिला होता. बोनस आणि पगरवाढीचा दुसरा हप्ता देण्यात यावा, अशी मागणी वीज कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानंतर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सध्या बोनस देणे शक्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. राज्य सरकार ऊर्जा मंत्रालय कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याची भूमिका घेत असेल, तर दिवाळीच्या दिवशी लायटिंग स्ट्राईक करण्याचा इशारा दिल्याने नागरिकांची धाकधूक वाढवली होती. या संपात महावितरण, महाजेनको व महापारेषण या वीज कंपन्यातील ८६ हजार अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर युद्ध स्तरावर झालेल्या हालचालींनंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत.

आता नागरिकांची दिवाळी अंधारात जाणार नाही-

वीज कंपनीत काम करणाऱ्या १६ संघटनांनी याआधी व्यवस्थापना सोबत या विषयावर चर्चा करून निवेदन सादर केले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघून न शकल्याने संघटनानी दिवाळीच्या दिवशी लायटिंग स्ट्राईकचा इशारा दिला होता. ज्यामुळे ही दिवाळी अंधारात तर जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, एन वेळेवर कामगार संघटनांमध्ये चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याने अंधाराच संकट दूर झाले आहे.

हेही वाचा- भाजपाच्या राज्य प्रभारींची यादी जाहीर; तावडेंकडे हरियाणा तर पंकजा मुंडेंकडे मध्य प्रदेशचा भार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.