नागपूर - शहरातील वर्धमान नगरमधील पूनम मॉलचे छत आणि भिंतीचा काही कोसळला. यामध्ये ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाला. प्रकाश शर्मा असे मृताचे नाव आहे.
गेल्या २ वर्षापासून पूनम मॉल बंद अवस्थेत पडला आहे. या मॉलच्यावर पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. त्या टाकीचा काही भाग मॉलवर कोसळला. त्यानंतर मॉलचे छत आणि भिंत कोसळल्याची माहिती अग्मिशमन विभागाने दिली. यावेळी या परिसरातील दुकाने बंद होती. मात्र, त्याठिकाणीच वॉचमॅनचे काम करणारे प्रकाश शर्मा या दुर्घटनेचे बळी ठरले.