नागपूर OBC Reservation : मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद आता हळूहळू चिघळताना दिसू लागला आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी नागपूरसह विविध ठिकाणी आंदोलने तसंच उपोषण सुरू झालं आहे. चंद्रपूरला रवींद्र टोंगे गेल्या बारा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यामुळं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं ओबीसी समाज आक्रमक झालाय. राज्य सरकारनं ओबीसीच्या आंदोलकांपुढं चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी या विषयावर मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. त्या संदर्भातलं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले परिणय फुके यांनी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना दिलेलं आहे. यावर इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा केली असता बैठकीत तोडगा निघेपर्यंत उपोषण असंच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
29 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक : येत्या २९ सप्टेंबर रोजी या विषयावर मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. त्या संदर्भातलं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले परिणय फुके यांनी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना दिलं आहे. यावर इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं तायवाडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय.
अन्नत्याग आंदोलन करणार : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी 13 दिवसांपूर्वी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सुरू करण्यात आलेलं आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारनं रविवारपर्यंत चर्चेला आमंत्रित न केल्यास सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचं तायवाडे यांनी म्हटलं आहे. त्यानुसार आता २९ सप्टेंबर रोजी या विषयावर बैठक बोलावण्यात आली आहे.
अशा आहेत प्रमुख मागण्या :
- सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.
- ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये.
- परराज्यातील कुणालाही कागदपत्राच्या आधारे महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र देऊ नये.
- जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
- 52 टक्के ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या नुसार५२ टक्के आरक्षण द्यावे.
- केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी
हेही वाचा -